Swati Maliwal Assault Case : केजरीवालांचे खासगी सहायक विभव कुमारांना २८ मे पर्यंत कोठडी; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

Swati Maliwal assault case : विभव कुमार हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सहायक आहेत.
Swati Maliwal Rajya Sabha Membership
Swati Maliwal Rajya Sabha MembershipEsakal
Updated on

नवी दिल्ली, ता. २४: राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या विभव कुमार यांची तीस हजारी न्यायालयाने २८ मे पर्यंत कोठडीत रवानगी केली आहे. विभव कुमार हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सहायक आहेत.

केजरीवाल यांच्या निवासस्थानी १३ मे रोजी मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तणूक झाली होती. विभव कुमार यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना तीस हजारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कुमार यांची २८ मे पर्यंत कोठडीत रवानगी केली. मालिवाल यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

Swati Maliwal Rajya Sabha Membership
Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील एमआयडीसी दुर्घटनेला २४ तास उलटले, तरी भावाचा शोध लागेना...; कुटुंबियांचा जीव टांगणीला

मालिवाल आणि विभव कुमार यांनी परस्परविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. मालिवाल या केजरीवाल यांच्या निवासस्थानी बळजबरीने घुसल्याचा आरोप कुमार यांनी केला होता. तर विभव कुमार यांनी सात ते आठ ठोसे लगावल्याचा तसेच खाली पाडून खेचल्याचा गंभीर आरोप मालिवाल यांनी केला होता.

Swati Maliwal Rajya Sabha Membership
Pune Porsche Accident: 'कारमध्ये 4 जण होते, ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला'; पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

मालिवाल यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली होती. न्यायालयात हजर करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी कुमार यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. मालिवाल यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. मारहाणीच्या घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी कुमार यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर ते फरारी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र १८ मे रोजी केजरीवाल यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was woman doctor assaulted in Kolhapur?
Maharashtra POCSO arrests latest
ADR Report Reveals Richest MP
Demand for ₹10 Lakh Dowry, Physical Abuse: Husband Booked in Pune
Marathi News Esakal
www.esakal.com