esakal | हवामान खात म्हणतंय, आता थंडी विसरुन उन्ह्याच्या झळा सोसायची ठेवा तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

Weather

उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये सध्या होरपळून टाकणाऱ्या उन्हाळ्याची शक्यता आहे.

हवामान खात म्हणतंय, आता थंडी विसरुन उन्ह्याच्या झळा सोसायची ठेवा तयारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये सध्या होरपळून टाकणाऱ्या उन्हाळ्याची शक्यता आहे. खासकरुन हरियाना, दिल्ली-एनसीआर, राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये हा कडक आणि तीव्र उन्हाळा असण्याची शक्यता IMD अर्थात भारतीय हवामान खात्याने सोमवारी वर्तवली आहे. यामध्ये IMD ने म्हटलंय की, कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा सरासरी 0.71 डिग्री सेल्सियसने अधिक असेल. 

हेही वाचा - राज्यसभा आणि लोकसभा टीव्ही एकत्र; आता 'संसद टीव्ही' नावाचं एकच चॅनेल

दरम्यान, छत्तीसगडमध्ये सामान्य तापमानापेक्षा 0.61 डिग्री सेल्सियसपने जास्त कमाल तापमान असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिल्ली, हरियाना, चंदिगढ, पंजाब, राजस्थान आणि इतर अनेक ठिकाणी फक्त दिवसांच नव्हे तर रात्री देखील सामान्य तापमानापेक्षा 0.86 डिग्री सेल्सियस जास्त तापमान असेल. दुसरीकडे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि तमीळनाडूमध्ये मात्र उत्तर भारतातील राज्यांपेक्षा तुलनेने कमी तापमान राहून दिवसा अल्हाददायक वातावरणाची शक्यता आहे. 

हेही वाचा - भारतीय लसींच्या IT सिस्टीमला हॅक करण्याचा चीनचा प्रयत्न; फॉर्म्यूला चोरण्याचा डाव

वारंवार मेघगर्जनेसह वादळे आणि कमी उष्णतेच्या प्रमाणामुळे मागच्या वर्षीचा उन्हाळा हा तितकासा कडक नव्हता. मात्र यंदाच्या IMD च्या अंदाजानुसार, सामान्य तापमानापेक्षा जास्तीत जास्त तापमान बर्‍याच उपविभागांमध्ये दिसून येईल. IMD ने गेल्याच महिन्यात म्हटलं होतं की, देशात जानेवारीमध्ये देशातील किमान तापमान हे गेल्या 62 वर्षातील सर्वात उष्ण तापमान होते. दक्षिण भारत विशेषतः जास्त उबदार होता.