तजिंदर बग्गांचा अरविंद केजरीवालांवर हल्ला; शंभर जोडेही खाल्ले...

Tajinder Pal Singh Bagga and arvind kejriwal
Tajinder Pal Singh Bagga and arvind kejriwalTajinder Pal Singh Bagga and arvind kejriwal

‘शंभर जोडेही खाल्ले आणि शंभर कांदेही खाल्ले’ ही म्हण आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत खरी ठरत आहे, असं म्हणत भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांनी केजरीवाल (arvind kejriwal) यांच्यावर हल्ला चढवला. अटकेतून दिलासा (Relief from arrest) मिळाल्यानंतर तजिंदर बग्गा यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मंगळवारी (ता. १०) बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांना मोठा दिलासा देत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने अटकेला ५ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोहाली न्यायालयाच्या निर्णयालाही स्थगिती मिळाली आहे. ज्यात न्यायालयाने पंजाब पोलिसांना बग्गा यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. यामुळे ​​पंजाब पोलिसांना जोरदार झटका दिला.

Tajinder Pal Singh Bagga and arvind kejriwal
पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराचा खून; लग्नघरी स्मशान शांतता

हायकोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करताना बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) म्हणाले, मी हायकोर्ट, भाजप, मीडिया, दिल्ली आणि हरयाणा पोलिसांचे आभार मानतो. तसेच अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) हे एफआयआर नोंदवून आम्हाला घाबरवतील असे वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. पंजाब जिंकल्यानंतर केजरीवालांना हे वाचत होते की ते कायद्यापेक्षा मोठे आहेत. परंतु, उच्च न्यायालयाने हे दाखवून दिले की कोणीही कायद्याच्या वर नाही, असेही बग्गा म्हणाले.

​​पंजाब पोलिसांना झटका

पंजाब (punjab police) आणि हरयाणा उच्च न्यायालयाचा (high court) निर्णय देखील महत्त्वाचा आहे. कारण, पंजाब सरकार ५ जुलैपर्यंत भाजप नेत्यावर कोणतीही कारवाई करू शकणार नाही. याआधीही मध्यरात्री झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने बग्गा यांच्या अटकेला १० मेपर्यंत स्थगिती दिली होती. यामुळे ​​पंजाब पोलिसांना जोरदार झटका दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com