यशवंतरावांच्या साधेपणाचा आदर्श घ्या; राज्यपाल पुरोहित यांचा मराठी अधिकाऱ्यांना सल्ला

चेन्नई - तामिळनाडूतील मराठी अधिकाऱ्यांनी शनिवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली.
चेन्नई - तामिळनाडूतील मराठी अधिकाऱ्यांनी शनिवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली.

नवी दिल्ली - महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्रिपद आणि देशाचे संरक्षणमंत्रीपद भूषवूनही साधे राहणीमान आणि साधनशुचितेसाठी आग्रही असलेले यशवंतराव चव्हाण संपत्तीसंचयापासून आयुष्यभर दूर होते. सार्वजनिक कार्यक्रमांना स्वखर्चाने जाण्याचा शिरस्ता पाळणाऱ्या यशवंतरावांवर, राजकारणाच्या अखेरच्या टप्प्यात मर्यादित आर्थिक शिलकीमुळे जवळच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमापासून दूर राहण्याची वेळ आली होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यशवंतराव चव्हाणांच्या या नितांत साधेपणाची आठवण आज तमिळनाडूच्या राजभवनात जागविली. या घटनेचे साक्षीदार राहिलेले राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी. निमित्त होते राज्यातील मराठी सनदी अधिकाऱ्यांच्या शिष्टाचार भेटीचे. सर्वसामान्यांचे रोल मॉडेल असलेल्या सनदी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे गरजा मर्यादित ठेवून काम करावे, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तमिळनाडूतील मराठी अधिकाऱ्यांच्या ‘मराठी पाऊल’या उपक्रमाअंतर्गत ही भेट झाली. राज्यातील जवळपास २२ मराठी अधिकाऱ्यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग आहे. राज्यपालांना आज भेटलेल्या अधिकाऱ्यांपैकी चंद्रकांत बी. कांबळे हे तामिळनाडूचे प्रधान सचिव आहेत.

तर संगीता गोडबोले या प्राप्तिकर विभागाच्या चेन्नईतील प्रधान आयुक्त आहेत. याव्यतिरिक्त नागरी पुरवठा सेवा आयुक्त सज्जनसिंह चव्हाण, तंजावर जिल्ह्याचे पोलिस आयुक्त शेखर देशमुख, इंडियन डिफेन्स इस्टेट सेवेचे दक्षिण विभागाचे अधिकारी विलास पवार, एन्फोर्समेन्ट, कमर्शिअल टॅक्सेस विभागाचे सहआयुक्त मनीष नरवणे, केंद्रीय अबकारी आणि सीमा शुल्क खात्याचे त्रिची विभागाचे सहाय्यक आयुक्त रविराज कलशेट्टी, चेन्नई विमानतळाचे सहाय्यक कमांडंट सागर कोळी हे अधिकारी देखील यात सहभागी झाले होते. राज्यपालांचे सचिव आनंदराव पाटील आणि राज्यपालांचे एडीसी प्रवीण डोंगरे यावेळी उपस्थित होते. राज्यपाल पुरोहित यांनी सार्वजनिक जीवनातील साधनशुचितेबद्दल चव्हाणांची आठवण सांगितली.

यशवंतरावांच्या खात्यात २८ हजार रुपये
१९८० च्या काळात  महाराष्ट्रात कॉंग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले बनवारीलाल पुरोहित हे प्रतापराव भोसले यांच्यासमवेत दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांना भेटले. या भेटीदरम्यान साताऱ्याचे एक शिष्टमंडळही पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन आले होते. चव्हाणांनी नम्रपणे नकार दिला. मात्र प्रतापराव भोसलेंनी हस्तक्षेप करून यशवंतराव चव्हाण कार्यक्रमाला येतील, असे सांगितले. हे ऐकून शिष्टमंडळ आनंदाने परतले. मात्र, यशवंतराव चव्हाण नाराज झाले. कार्यक्रमाला नकार देण्याचे कारण त्यांनी आपले पासबुक दाखवून दिले. त्यांच्या खात्यामध्ये २८००० रुपये शिल्लक होते. एवढ्या रकमेत दिल्लीत उर्वरित काळासाठी राहायचे असल्याने कार्यक्रमासाठी जाण्यायेण्याचा किमान १००० रुपये खर्च शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. महाराष्ट्रासारख्या सधन राज्याचे मुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्री यासारख्या महत्त्वाच्या पदांवर राहूनही यशवंतराव चव्हाणांनी कधीही संपत्ती जमविण्याचा विचारही केला नव्हता. सार्वजनिक जीवनातील हा साधेपणा विरळा असतो.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com