तालिबानचे काबूल विमानतळावर नियंत्रण; अफगाणींसाठी विमानतळ बंद

तालिबानकडून नियंत्रण घट्ट; सुटका मोहिमा अंतिम टप्प्यात
kabul
kabulsakal

काबूल : अमेरिकेसह ‘नाटो’ गटातील देशांच्या अफगाणिस्तानमधील सुटका मोहिमा संपल्याने किंवा अंतिम टप्प्यात आल्याने तालिबानने काबूल विमानतळावर नियंत्रण मिळविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यांनी अफगाणी नागरिकांना विमानतळावर प्रवेश बंद केला आहे. विमानतळावरील हल्ल्यानंतर अनेक देशांनी सुटका मोहिम गुंडाळल्याने अद्यापही अनेक विदेशी नागरिक अफगानिस्तानात अडकून पडले आहेत. (InterNational News)

kabul
आधी ‘जय श्री राम’ म्हण! मुस्लिम व्यक्तीवर सक्ती; दोघांना अटक

काबूलचा पाडाव झाल्यापासून, म्हणजे १५ ऑगस्टपासून तालिबानी दहशतवाद्यांनी काबूल विमानतळाबाहेर त्यांचे तपास नाके उभे केले आहेत. विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात असला तरी आतमध्ये जाण्यासाठी बाहेर ‘बंदोबस्ता’ला असलेल्या तालिबान्यांकडून कागपदत्र तपासून घेऊनच प्रवेश करता येत होता.

आता त्यांनी अफगाणी नागरिकांना प्रवेश देणे बंद केले आहे. कालपासूनच (ता. २८) विमानतळाबाहेरील तालिबान्यांची संख्या वाढली आहे. देश सोडून जाण्याच्या इच्छेने गेले दोन आठवडे अफगाणी नागरिकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारा विमानळाचा परिसर आता रिकामा झाला आहे.

kabul
टोमॅटो उत्पादकांसमोर मोझॅकचं संकट ते देवमाशाला होते चार पाय, नवं संशोधन

केवळ अमेरिकेचा पासपोर्ट असलेल्यांनाच विमानतळावर प्रवेश करु दिला जात आहे. विमानतळाचा ताबा शांततापूर्ण मार्गाने मिळेल, अशी आशा तालिबानचा प्रवक्ता झबीहउल्ला मुजाहिद याने व्यक्त केली आहे. अमेरिकेने एका मागून एक विमाने अफगाणिस्तानात पाठवत आतापर्यंत एक लाख १३ हजार ५०० हून अधिक अमेरिकी आणि अफगाणी नागरिकांची सुटका केली आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत दोन हजार जणांना देशाबाहेर नेण्यात आले.

मोहिम थांबविण्याची अंतिम तारीख (३१ ऑगस्ट) दोन दिवसांवर आली आहे. अफगाणी नागरिकांना रोखण्यासाठी विमानतळाबाहेर तालिबानने अनेक तपास नाके उभारले आहेत. तेथे गणवेशातील तालिबानी दहशतवादी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे अफगाण सैनिकांकडून हिरावून घेतलेले ‘नाइट-व्हिजन’ गॉगल आणि हमव्ही या चिलखती गाड्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com