
Controversy in Delhi Taliban Minister Restricts Female Journalists
Esakal
अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानच सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आलेत. याच तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले अमीर खान मुतक्की भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला एकाही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार महिलांवर लावलेल्या कठोर निर्बंधामुळे ओळखलं जातं. महिलांना काम करण्यापासूनही रोखलं जातं. याशिवाय तालिबान सरकारकडून मानवाधिकाराचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांना संरक्षण दिलं जात असल्यानं जगभरातून त्यांच्यावर टीका होत असते.