esakal | धक्कादायक ! ३६ वर्षीय तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

tamil actor sethuraman passes away due to cardiac arrest

सध्या देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच 36 वर्षीय तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तमिळ अभिनेता सेथुरामन याचं काल (ता.२७) गुरुवारी रात्री चेन्नई येथे निधन झालं. त्याच्या निधनामुळे फक्त त्याचे कुटुंबीयच नाही तर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

धक्कादायक ! ३६ वर्षीय तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन

sakal_logo
By
वृत्तसेवा

चेन्नई : सध्या देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच 36 वर्षीय तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तमिळ अभिनेता सेथुरामन याचं काल (ता.२७) गुरुवारी रात्री चेन्नई येथे निधन झालं. त्याच्या निधनामुळे फक्त त्याचे कुटुंबीयच नाही तर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सेथुरामन याला रात्री ०९ च्या दरम्यान कार्डियक अरेस्ट अ‍ॅटॅक आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सेथुरामन 2013मध्ये आलेल्या रोमँटिक कॉमेडी सिनेमा कन्ना लड्डू थिना आनामधून लोकप्रिय झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे.


चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं ९४ व्या वर्षी निधन

तत्पूर्वी, अभिनेता सेथुरामन विवाहित होता. दाक्षिणात्य अभिनेता सतीश आणि अभिनेत्री ऐश्वर्या राजेश यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून सेथुरामनच्या निधनाची माहिती दिली आहे. सतीशनं ट्वीट केले आहे की, सेथुरामनच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. काही तासांपूर्वीच कार्डियक अरेस्टमुळे सेथुरामन याचं निधन झालं.

Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने रद्द !

अभिनेता सेथुरामननं काही दिवसांपूर्वीच COVID-19च्या जागतिक प्रसाराबाबत बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. कन्ना लड्डू थिना आना या सिनेमाव्यतिरिक्त सेथुरामननं २०१६ ला आलेल्या वलीबा राजा, २०१७ ला आलेल्या सक्का पोडु पोडु राजा आणि २०१९ ला आलेल्या 50/50 या सिनेमांत काम केलं होतं.

loading image
go to top