

BJP alliance crisis
ESakal
तामिळनाडूतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला धक्का बसला आहे. तामिळ मानिला काँग्रेसचे नेते जी. के. वासन यांनी भाजपप्रणित एनडीएशी संबंध तोडले आहेत. वासन यांचा पक्ष आता एनडीएपासून वेगळा झाला आहे. पक्षाला मजबूत करण्यासाठी भाजपप्रणित आघाडी सोडण्याचा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तामिळ मानिला काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक रविवारी चेन्नईतील एग्मोर येथे झाली.