Nitin Gadkari: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुख्यमंत्र्यांना ट्रेनने प्रवास करावा लागला; थेट गडकरींना पत्र


Nitin Gadkari
Nitin Gadkariesakal

नवी दिल्लीः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आदराने 'रोडकरी' म्हटलं जातं. परंतु देशपातळीवर त्यांच्या खात्याचे वाभाडे एका पत्रामुळं निघाले आहेत. याच पत्राची आज देशभर चर्चा आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी आज केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी चेन्नई ते राणीपेट या राष्ट्रीय महामार्ग ४ च्या दूरवस्थेबद्दल लिहिलं आहे.

"रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की मला माझ्या काही जिल्ह्यांना ट्रेनने भेटी द्याव्या लागल्या" असं मुख्यमंत्री एमके स्टालिन म्हणाले आहेत. ते पुढे म्हणातात, तामिळनाडू सरकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य करत नाही, असं म्हणणं चुकीचं आहे.


Nitin Gadkari
Devendra Fadnavis : मी यांच्या बापालाही घाबरत नाही; फडणवीसांची जीभ घसरली

नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खासदार दयानिधी मारन यांनी या रस्त्याच्या दूरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. या रस्त्यामुळे आपल्याला ट्रेनने प्रवास करावा लागल्याचं स्टालिन यांनी सांगितलं.


Nitin Gadkari
Devendra Fadnavis : 2024मध्ये आमदार श्रीकांत हे निवडणूक इन्चार्ज; भाजकडून विजयाचा महासंकल्प

देशभर नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक होत असतांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खात्यावर आणि त्यांच्या कामकाजावर आक्षेप घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यावर नितीन गडकरी किंवा त्यांच्या खात्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com