

Tamil Nadu child marriage cases
ESakal
तामिळनाडूच्या तिरुपत्तूर जिल्ह्यात सोशल मीडियावरून सुरू झालेल्या प्रेमप्रकरणांमुळे मोठ्या प्रमाणात बालविवाह झाले आहेत. ज्यामुळे शेकडो अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी ३०० तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आणि तपासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. २०२५ मध्ये तिरुपत्तूर जिल्ह्यातील अंबूर, वानियामबाडी, नत्रुमपल्ली आणि तिरुपत्तूर तालुक्यांमध्ये शेकडो बालविवाहांची नोंद झाली.