esakal | द्रमुकच्या विजयानंतर महिलेने कापली जीभ; नवसपूर्ती झाल्याने देवाला केली अर्पण
sakal

बोलून बातमी शोधा

द्रमुकच्या विजयानंतर महिलेने कापली जीभ; नवसपूर्ती झाल्याने देवाला केली अर्पण

द्रमुकच्या विजयानंतर महिलेने कापली जीभ; नवसपूर्ती झाल्याने देवाला केली अर्पण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला व्यक्ती काहीही करु शकतो. माणसाच्या मनाचा ताबा जर अशा कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेने घेतला असेल, तर तो त्याच्या प्रभावाखाली अत्यंत विचित्र अशी कृती देखील सहजतेने करु शकतो. अशीच काहीशी घटना आता तमिळनाडूमधून समोर येतीय. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाला धूळ चारुन द्रमुक पक्षाने विजयी मुंसडी मारली आहे. तब्बल दहा वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या द्रमुकने एम के स्टालिन यांच्या नेतृत्वामध्ये निर्विवाद असं बहुमत प्राप्त केलं आहे. मात्र, द्रमुकचा हा विजय व्हावा, म्हणून एका महिलेने देखील एक संकल्प केला होता, जो आता पूर्ण झाला आहे.

हेही वाचा: लसनिर्मितीसाठी कटीबद्ध; केंद्राच्या खुलाशावर 'सीरम'सुद्धा सहमत

तमिळनाडूतील या महिलेने संकल्प केला होता की, द्रमुकने जर ही निवडणूक जिंकली तर तिने आपली जीभ बळी देण्याचा निर्धार केला होता. काल द्रमुक पक्षाने निवडणूक जिंकल्यानंतर या महिलेचा संकल्प पूर्ण झाला आणि त्या महिलेने मंदिरात जाऊन आपली जीभ अर्पण केली आहे. 32 वर्षीय वनिता नावाच्या महिलेने ही कृती केली आहे. आपला संकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर तिने आपलं वचन पूर्ण करण्यासाठी मंदिरातील देवतेसमोर आपली जीभ अर्पण केली आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर सध्या निर्बंध आहेत. त्यामुळे वनिता यांनी मंदिराच्या मुख्य गेटवरच आपली जीभ कापून ठेवली आणि त्यानंतर काही वेळातच त्या जमिनीवर कोसळल्या. या महिलेने आपली जीभ अर्पण केल्यानंतर आता तिला अत्यावस्थ अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. तिची अवस्था गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तमिळनाडूमध्ये एम के स्टालिन यांच्या नेतृत्वाखआली द्रमुक पक्षाने आपल्या सहकारी पक्षांसमवेत तब्बल 154 जागांवर विजय मिळवला आहे. 234 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये 118 जागा जिंकणे अपेक्षित असताना द्रमुकने निर्विवाद सत्ता हस्तंगत केली आहे.

loading image