सैराट! संतापलेल्या पित्याने जोडप्याला संपवलं, क्षुल्लक कारण आलं समोर

Man Kills Newly-Wed Daughter, Husband
Man Kills Newly-Wed Daughter, Husband
Updated on

चेन्नई : तामिळनाडूमध्ये एका नवविवाहित जोडप्याची मुलीच्या वडिलांनी निर्घुण हत्या केली. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याने नवविवाहित महिलेचे वडील तिच्यावर नाराज होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हत्येनंतर मुलीच्या पित्याने पोलिसांसमोर समर्पण केलं. या हत्येसाठीचं क्षुल्लक कारण समोर आलं आहे. थुथुकुडी जिल्ह्यातील तुतीकोरीन या शहरात ही घटना घडली आहे. (Man Kills Newly-Wed Daughter, Husband news in marathi)

Man Kills Newly-Wed Daughter, Husband
Husband Killed Ex-Wife: पहिल्या पत्नीला जीवंत जाळणाऱ्या टांग लूला अखेर न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

मुलीने घरातून पळून जात मुलासोबत लग्न केलं. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबाने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर फरार झालेल्या जोडप्याने मदुराई येथे पोलिसांसमोर हजर होत आम्ही दोघेही प्रौढ आहेत आणि लग्न केल्याचं स्पष्ट केलं.

तुतिकोरिनमधील वरिष्ठ पोलीस बालाजी सरवणन यांनी सांगितले की, "या जोडप्याने पोलीस स्टेशनमधून व्हिडिओ कॉलवर महिलेच्या पालकांशीही संवाद साधला. तसेच त्यांनी पोलिस संरक्षण देखील मागितले नाही. तर घरातील इतर वडिलधारांनी देखील मुलीच्या कुटुंबाला नवदाम्पत्याला त्रास न देण्याच्या सूचना केल्या होत्या.

Man Kills Newly-Wed Daughter, Husband
तामिळनाडूमध्ये विद्यार्थीनी आत्महत्येची तिसरी घटना; आई रागावल्याने घेतला गळफास

हे जोडपं भाड्याच्या घरात राहतं होतं. त्यांच्या भाड्याच्या घरातच दोघांची हत्या करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या वडिलांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. "हे जोडपे एकाच अनुसूचित जातीचे होते. मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. तर नवरा मुलाने शालेय शिक्षणानंतर पुढे शिक्षण घेतले नव्हते. हेच मुलीच्या वडिलांना खटकत होतं. त्यातूनच जोडप्याची हत्या झाल्याचं सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com