तामिळनाडूमध्ये विद्यार्थीनी आत्महत्येची तिसरी घटना; आई रागावल्याने घेतला गळफास

Suicidal death news
Suicidal death news esakal

कुड्डालोर - तामिनाडूमध्ये मागील काही दिवसांपासून विद्यार्थींनींच्या आत्महत्येच्या घटना सतात्याने घडत आहेत. महिनाभरात आत्महत्येच्या चीन घटना घडल्या असून तिसरी घटना कुड्डालोर येथी घडली आहे.येथे १२ वीत शकत असलेल्या मुलीने आई रागवल्याच्या रागातून गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. (student suicide in Tamil Nadu news in Marathi)

Suicidal death news
तुमचा मुलगा धाडसी होता...; वडिलांना मेसेज पाठवत विद्यार्थ्याची आत्महत्या

आई-वडील घरी नसताना मुलीने गळफास लावून घेतला. कुटुंबीय मंगळवारी मयत मुलीचे अंत्यसंस्काराच्या तयारीत असताना विद्यार्थिनीच्या मृत्यूची माहिती पोलिसांना मिळली. त्यानतंर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी विरुथाचलम सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी सध्या संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याआधी सोमवारी पहाटेच्या दरम्यान, तिरुवल्लूर जिल्ह्यातील एका सरकारी महाविद्यालयात 12 वीच्या आणखी एका मुलीने तिच्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. तर 13 जुलै रोजी इयत्ता 12 वीच्या मुलीचा शाळेच्या आवारात संसयास्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. त्यानतंर मोठा हिंसाचार घडला होता.

Suicidal death news
राज्यसभेतील १९ खासदार आठवडाभरासाठी निलंबित; दोन दिवसांत दुसऱ्यांदा कारवाई

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील विरुधाचलम अय्यर मठात राहणारे गोपी तिथेच सेल सर्व्हिस सेंटरचे दुकान चालवतात. त्यांना दोन मुली आहेत. त्यांची दुसरी मुलगी शिवकामी वृद्धचलम येथील नॉर्थ पेरियार नगर येथील शक्ती मॅट्रिक्युलेशन प्रायव्हेट स्कूलमध्ये बारावीची विद्यार्थिनी आहे. शिवकामीने सोमवारी त्यांच्या शाळेत दर महिन्याला होणारी परीक्षा दिली. परीक्षा देऊन घरी परतलेली शिवकामी खूप दुःखी असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री नऊच्या सुमारास घरी कोणी नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. रात्री उशिरा मुलीचे कुटुंबीय कामावरून घरी परतले असता त्यांना मुलगी लटकलेल्या अवस्थेत दिसली.

मुख्यमंत्री स्ट्रलिन यांचे आवाहन

तामिळनाडूमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबाबत मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून न पाहता सेवा म्हणून पाहावे. तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवावी. तसेच विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा विचार न करता त्यांचे ध्येय पूर्ण करण्याचा विचार केला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com