Husband Killed Ex-Wife: पहिल्या पत्नीला जीवंत जाळणाऱ्या टांग लूला अखेर न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

दोन वर्षाआधी घडलेल्या या घटनेचा अखेर निकाल लावत न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Husband Killed Ex-Wife
Husband Killed Ex-Wifeesakal

घटस्फोट दिलेल्या पत्नीशी परत एकदा बळजबरीने लग्न करण्यास भाग पाडणाऱ्या क्रूर नवऱ्याने त्याच्या पत्नीला जीवंत जाळत तिचा जीव घेतला होता. दोन वर्षाआधी घडलेल्या या घटनेचा अखेर निकाल लावत न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुणावली आहे. (Husband Killed Ex-Wife)

पत्नीला जीवंत जाळण्याची ही घटना सोशल मीडियावर युजर्सने लाईव्ह बघितली

२०२० मधे टांग लू आणि त्याची पहिली पत्नी लामो यांचा घटस्फोट झाला होता. दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतातील या जोडप्याने घटस्फोट घेतल्यानंतरही टांग लूने लामोचा पाठलाग करणं काही सोडलं नव्हतं. टांग लूला त्याच्या पहिल्या पत्नीशी परत लग्न करायचं होतं. मात्र लामोने त्याला नकार दिला होता. घटस्फोटाच्या तीन महिन्यानंतर टांग लू परत त्याच्या पहिल्या पत्नी लामोजवळ पोहोचला त्यावेळी लामो सोशल मीडियावर लाईव्ह करत होती. टांग लूने अचानक तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळलं. या घटनेदरम्यान लामोचं सोशल मीडियावरील लाईव्ह बंद झालं नव्हतं. त्यामुळे घटनेचं लाईव्ह स्टीमिंग लोकांना त्यावेळी दिसलं.

Husband Killed Ex-Wife
Crime Update : आई-बापाला मारण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार

घटनेनंतर पोलीसांनी टांग लूला अटक करून पुढचा तपास सुरू केला होता. फाशीची शिक्षा सुनावण्याआधी न्यायालयाने कुटुंबाशी एकदा भेटण्याची टांग लूला परवानगी मिळाली होती. त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आता त्याला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधीही सोशल मीडियावर क्रूर टांगलूला कठीणात कठीण शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. चीनमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत होती. लोकांनी चीनच्या कायदा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com