आईचा मृतदेह मुलाने व्हीलचेअरवरून नेला स्मशानभूमीत; कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man takes mother’s body to crematorium in wheelchair

आईचा मृतदेह मुलाने व्हीलचेअरवरून नेला स्मशानभूमीत; कारण...

चेन्नई - तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील एका व्यक्तीने आपल्या मृत आईचा मृतदेह गुरुवारी पहाटे व्हीलचेअरवरून स्मशानभूमीत नेला. या संदर्भात मानपराई येथील कॉर्पोरेशन स्मशानभूमीने माहिती दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. (Man takes mother’s body to crematorium in wheelchair)

हेही वाचा: ‘भारत जोडो’ यात्रेत भाजपशासित राज्यात इंधन भरा, पैसे वाचतील; BJPचा काँग्रेसला टोला

स्मशानभूमीचे व्यवस्थापन करणार्‍या स्थानिक लायन्स क्लब युनिटचे विश्वस्त एन श्रीधरन यांच्या म्हणण्यानुसार, मानपराईजवळील भरथियार नगरमध्ये राहणारे इलेक्ट्रिशियन मुरुगानंदम यांनी त्याच्या मातोश्री राजेश्वरी ( 84) यांचा मृतदेह 2.5 किमी अंतरावरून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणला होता. मात्री रुग्णालयातून मृत्यू प्रमाणपत्र मिळविल्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं श्रीधरन यांनी सांगितलं.

श्रीधरन पुढं म्हणाले की, “मला स्मशानभूमीजवळच्याच चहाच्या दुकानाच्या मालकाचा सकाळी 6 च्या सुमारास फोन आला. त्याने मला माहिती दिली की एक माणूस व्हीलचेअरवर कापडात गुंडाळलेला मृतदेह घेऊन स्मशानभूमीसमोर थांबला आहे. मी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर विचारपूस केल्यानंतर मुरुगानंदम यांनी सांगितले की त्यांच्या आईचा दीर्घ आजारामुळे पहाटे 4 वाजता मृत्यू झाला.

हेही वाचा: नगरसेवकाचे महिलेशी गैरवर्तन! विरोध करणाऱ्या महिलेच्या पतीची हत्या करून झाला फरार

दरम्यान मृतदेह व्हीलचेअरवर का आणला, असा प्रश्न विचारला. त्यावर मरुगानंदम यांनी म्हटलं की, त्याच्या आईला सोरायसिसचा त्रास होता. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आपल्याला कोणीही मदत करणार नाही असे आपल्याला वाटलं, असंही श्रीधरन म्हणाले.

Web Title: Tamil Nadu Man Takes Mothers Body To Crematorium In Wheelchair

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tamil Nadudead