शिवानं पाण्याच्या बाटलीत ठेवलेलं अॅसिड कवितावर ओतलं. कविता वेदनेनं ओरडू लागली. ती खाली जमिनीवर कोसळली.
Tamil Nadu News : तामिळनाडूच्या कोईम्बतूर न्यायालयात गुरुवारी एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर अॅसिड फेकल्यामुळं मोठी खळबळ उडाली. या अॅसिड हल्ल्यात महिलेसोबत एक वकीलही भाजली आहे.
ही घटना घडल्यानंतर आरोपी पळू लागला. मात्र, वकिलांनी त्याला पकडलं आणि त्याला मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. ही महिला एका खटल्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी आली होती. ती जवळपास 80 टक्के भाजली आहे. सहा वर्षांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात महिलेला पकडलं होतं.
कोईम्बतूरच्या रामनाथपुरममधील कावेरी नगर येथील कविता (33) हिला 2016 मध्ये बस प्रवाशाकडून 10 तोळे सोन्याची चेन चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या दिवसांत ती जामिनावर बाहेर होती. पण, प्रकरण कोर्टात असल्यामुळं ती ठरलेल्या तारखेला सुनावणीला हजर राहायची.
गुरुवारी कविता याच खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयात जात होती. तिचा नवरा शिव तिचा पाठलाग करत होता. कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये आल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. शिव तिला परत घरी घेऊन जाण्यासाठी तिथं आला होतो, पण कवितानं माघारी येण्यास नकार दिला.
त्यानंतर शिवानं पाण्याच्या बाटलीत ठेवलेलं अॅसिड कवितावर ओतलं. कविता वेदनेनं ओरडू लागली. ती खाली जमिनीवर कोसळली. हे पाहून शेजारी उभ्या असलेल्या महिला वकिलानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीही त्यात भाजली. घाईघाईत दोघांनाही कोईम्बतूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.
त्याचवेळी इतर वकिलांनी पळून जाणाऱ्या शिवाला पकडलं. त्याला जबर मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. कविता मानेच्या खाली गंभीररित्या भाजली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ती 80 टक्के भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
आरोपी शिवकुमार उर्फ शिवा हा लॉरी चालक आहे. त्याला दोन मुलंही आहेत. पण, कविता आपल्या मुलांपासून आणि पतीपासून विभक्त राहते. कविताचं एका व्यक्तीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप आहे. यावरून दोघांमध्ये पूर्वीपासून वाद सुरु आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.