

Will Vijay Become Tamil Nadu’s New MGR? DMK-AIADMK Alliance Buzz Triggers Political Earthquake
esakal
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे. कोणत्याही पक्ष किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेला अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात गेल्या पाच दशकांत अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष असलेले डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात संभाव्य युती होण्याची चर्चा जोरात आहे. अभिनेते-राजकारणी विजय यांच्या तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी ही युती होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यात भाजपदेखील महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.