esakal | आणखी एका राज्यात मोफत कोरोना लशीची घोषणा 
sakal

बोलून बातमी शोधा

tamil nadu to provide free covid vaccine cm palaniswami

देशात महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते आणि आताही आहेत. दिल्लीतही मोठ्या प्रमाणावर नागरिकांना कोरोनाची लागण झाली.

आणखी एका राज्यात मोफत कोरोना लशीची घोषणा 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

चेन्नई : बिहार निवडणुकीत आज, भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली. त्यावर विरोधकांकडून चौफेर टीका होत आहे. त्याचवेळी आता दक्षिणेतील एका राज्याने मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली. अजून कोरोनाची शाश्वत लस तयार झाल्याची घोषणा झालेली नाही. तरीही लशीच्या वाटपाच्या घोषणा सुरू झाल्या आहेत. 

आणखी वाचा - भाजपचं मोफत लशीचं आश्वासन, विरोधकांची जोरदार टीका

देशात महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते आणि आताही आहेत. दिल्लीतही मोठ्या प्रमाणावर नागरिकांना कोरोनाची लागण झाली. दक्षिण भारतात तमीळनाडूमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला होता. सध्या कोरोनाची लाट थोडी आटोक्यात आली असली तरी, कोरोनाची लस देण्यासाठीची यंत्रणा उभारण्याचे काम सरकारकडून सुरू झाले आहे. दरम्यान, तमीळनाडूचे मुख्यमंत्री ई. पळनीस्वामी यांनी आज, राज्यात कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली. एकदा कोरोनाची लस तयार झाली की, ती राज्यातील नागरिकांना मोफत देण्यात येईल, असं मुख्यमंत्री पळनीस्वामी यांनी म्हटलंय. 

आणखी वाचा - सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सुनावणीची ढकलगाडी थांबणार

मुख्यंत्री पळनीस्वामी यांनी पडुकोट्टाई जिल्ह्यात मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, 'कोरोनाची लस तयार झाली की, ती राज्यातील नागरिकांना मोफत देण्यात येईल.' एका बाजुला बिहारमध्ये मोफत कोरोना लस देण्याचं आश्वासन भाजपने दिल्यानंतर त्याच दिवशी पळनीस्वामी यांनी तमीळनाडूच्या नागरिकांसाठी कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केल्यामुळं त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय.