मुसळधार पावसात 4 तास केली ड्युटी; SP नी स्वत: येऊन ट्राफिक पोलिसाला दिलं सरप्राइज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

ऑन ड्युटी 24 तास काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कधी कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागेल हे सांगता येत नाही. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत हे लोक त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात.

चेन्नई - ऑन ड्युटी 24 तास काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कधी कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागेल हे सांगता येत नाही. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत हे लोक त्यांचं कर्तव्य पार पाडत असतात. याशिवाय येणाऱ्या इतर आपत्तींचा सामनाही त्यांना करावा लागतो. सध्या तामिळनाडुमधील तूतिकोरीनच्या एका ट्राफिक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळ असलेल्या रस्त्यावर ट्राफिक कंट्रोल करणाऱ्या पोलिसाचे सध्या कौतुक होत आहे. जवळपास चार तास मुसळधार पावसात उभा राहून वाहतूक नियंत्रण हा पोलिस करत आहे. 

तामिळनाडुची राजधानी चेन्नईपासून 600 किमी अंतरावर असलेल्या शहरात कॉन्स्टेबल मुथुराज ट्राफिक पोलिसाचे काम करतात. सोमवारी शहरात मुसळधार पाऊस झाला. यावेळी चार तास ते भरपावसात रस्त्यावर उभा होते. एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते रेनकोट घालून रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करताना दिसत आहेत. 

हे वाचा - हे बरंय! पठ्ठ्याने सात वर्षांपूर्वी दुकानाचं नाव ठेवलं 'कोरोना'; आता होतोय फायदा

पोलिस अधीक्षक एस जयकुमार यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तेसुद्धा हैराण झाले. त्यांनी ट्राफिक पोलिसाची भेट घेऊन एक सरप्राइज दिलं. एस जयकुमार यांनी म्हटलं की, पाऊस सुरु असताना अशा परिस्थितीतही त्या पोलिसाने काम चोख पार पाडलं. त्याच्या कर्तव्य तत्परतेचा सन्मान करण्याची इच्छा होती. 

एस जयकुमार यांनी दिलेल्या सरप्राइज गिफ्टमुळे आनंदी झालेल्या मुथुराज यांनी म्हटलं की, मी खूप आनंदी असून अभिमान वाटत आहे. माझ्याजवळ येऊन गौरव केला आणि त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी वेळ काढला. सामान्यपणे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचा सन्मान हा पोलिस अधीक्षक कार्यालयात केला जातो. मी आमच्या रिझर्व्ह पोलिस इन्स्पेक्टर यांचे आभार मानतो. ते माझ्यासाठी प्रेरणा आहेत.

वाचा Positive Story : मानलं राव! नोकरी सोडून शैलजा घेतेय भटक्या कुत्र्यांची काळजी

मुथुराज यांना त्यांच्या कामाबाबत विचारले अशता ते म्हणाले की, हे माझं काम आहे. मला दुचाकीस्वारांची काळजी वाटत होती. ट्राफिक सिग्नलवर त्यांना थांबावं लागतं आणि ते पूर्णपणे भिजतात. यासाठी मी सिग्नल बंद केला होता आणि मॅन्युअली काम केलं. यामुळे दुचाकीस्वारांसाठी सोपं झालं. 
भारत भारत भारत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tamilnadu traffic police duty in full rain 4 hours video viral