बिसलेरी पाण्याला मिळणार 'टाटा'ची चव; 7000 कोटींचा करार होणार अंतिम! Tata Group | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Group To Acquire Bisleri

बाटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड बिसलेरी आता टाटा समूहाकडं आला आहे.

Tata Group : बिसलेरी पाण्याला मिळणार 'टाटा'ची चव; 7000 कोटींचा करार होणार अंतिम!

Tata Group To Acquire Bisleri : टाटा समूहाची (Tata Group) कंपनी-टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड लवकरच 'बिसलेरी ब्रँड' आपल्या नावावर करणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तपत्रानुसार, हा करार 7000 कोटींमध्ये निश्चित होण्याची अपेक्षा आहे. पॅकेज्ड वॉटर मेकर बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांच्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आलीय.

बाटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड बिसलेरी (Bisleri) आता टाटा समुहाकडं (Tata Group) आला आहे. टाटा कन्झ्युमर कंपनीनं बिसलेरी ब्रँड विकत घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि बिसलेरी यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाहीये. जाणकारांच्या मते, हा करार अंतिम झाल्यानंतर टाटा समूहाची कंपनी वॉटर मार्केटमधील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास येऊ शकते. टाटा समूहाचा ग्राहक व्यवसाय टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) अंतर्गत येतो.

हेही वाचा: Political News : वंचित बहुजन आघाडी-राष्ट्रवादीची युती होणार? प्रकाश आंबेडकरांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांच्या अध्यक्षतेखाली हा ब्रँड भारतात चांगलाच फोफावला. त्यानंतर टाटांनी तब्बल 7 हजार कोटींना हा ब्रँड विकत घेतला. पुढील दोन वर्षे बिसलेरीचं मॅनेजमेंट विद्यमान कंपनीकडंच राहील. त्यानंतर टाटा कन्झ्युमर हे व्यवस्थापन ताब्यात घेईल. याआधी सुमारे 30 वर्षांपूर्वी रमेश चौहान यांनी थम्प्स अप (Thumps up), गोल्ड स्पॉट (Gold spot), लिमका (Limca) हे कोल्ड ड्रिंक्सचे ब्रँड (cold drinks Brands) कोकाकोला (coca cola) या अमेरिकन कंपनीला विकले होते.

हेही वाचा: Cursed Chair : 'या' खुर्चीवर जो कोणी बसला, तो कायमचा देवाघरी गेला; इंग्लंडच्या संग्रहालयात आहे शापित खुर्ची!

बाजार संशोधन आणि सल्लागार TechSci संशोधन यांच्या अहवालानुसार, भारतीय बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ FY2021 मध्ये US$ 2.43 अब्ज (अंदाजे 19,315 कोटी) पेक्षा जास्त होती. बाटलीबंद पाणी ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. बाजारात उघड्यावर मिळणाऱ्या सामान्य पाण्यापेक्षा ते अधिक स्वच्छ मानलं जातं. उघडे पाणी आरोग्यासाठी चांगलं मानलं जात नाही आणि पिण्यासाठीही असुरक्षित आहे, असंही अहवालात नमूद आहे. कोका-कोला इंडियासह अनेक कंपन्या बाटलीबंद पाण्याच्या बाजारात त्यांच्या ब्रँडशी स्पर्धा करत आहेत.

टॅग्स :waterTata Group