मनं जिंकली! कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना टाटांची आयुष्यभराची मदत

Ratan TaTa
Ratan TaTa

Tata Steel, Coronavirus : कोरोना महामारीच्या (covid-19) दुसऱ्या लाटेनं भारतामध्ये हाहा:कार माजवला आहे. आरोग्य व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवारा, गोळ्या औषधांचा तुटवडा, ऑक्सिज आणि बेडची कमतरता यामुळे अनेकांना जीव गमावावा लागला. कोरोनामुळे हजारोंचा जीव गेलाय. यामध्ये कुणाचे आई-वडिल, भाऊ, आजी-आजोबा, जुळी भावंड तर कुणी आपले मुलंही गमावली. काही ठिकाणी घरातील कर्त कमवता व्यक्तीलाच कोरोनानं गाठलं. अशा कठीण प्रसंगात टाटा स्टील आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं आहे. कारण, कोरोनाच्या दुसर्या लाटेत, टाटा स्टीलचे (Tata Steel) कर्मचारीही आपलं काम चोख बजावत आहे. त्यामुळे कंपनीचं उत्पादन सुरळीतपणे सुरु आहे. अशातच अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनानं आपल्या दाढेत ओढलं आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी टाटानं मोठ पाऊल उचललं आहे. टाटांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

जर कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत पगार मिळणार (last drawn salary) म्हणजेच, त्याला मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार मिळाला तेवढा पगार वयाच्या 60 वर्षांपर्यंत कुटुंबातील वारसदाराला मिळणार आहे, असं टाटा स्टील (TATA STEEL) नं जाहीर केलं आहे. टाटांच्या या निर्णायानंतर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. टाटा स्टिलनं एक परिपत्रक ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Ratan TaTa
लढा कोरोनाशी! टाटा ग्रुप करणार 2 हजार कोटींचा खर्च

"कोरोना संकाटात (covid-19) टाटा स्टील आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सामाजिक सुरक्षेतंर्गत टाटा स्टील आपल्या कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी शक्य ती पावलं उचलून पुढाकार घेत आहे. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या उत्तम भविष्यासाठी टाटा स्टीलनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. कोरोनामुळे जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत पगार मिळणार आहे. तसेच त्या कर्मचाऱ्याला जर कंपनीकडून राहण्यासाठी घर मिळालं असेल तर त्याच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत त्या घरात राहता येईल, तसेच कर्मचाऱ्याच्या वारसदाराला सर्व वैद्यकीय सुविधांचा लाभही घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com