
Shocking Crime Teacher Couple Tried to Kill Newborn to Save Job
Esakal
मध्य प्रदेशात एका तीन दिवसांच्या बाळाला जंगलात फेकून देण्यात आलं होतं. त्याच्यावर दगड ठेवला होता. धक्कादायक म्हणजे बाळाच्या आई-वडिलांनीच हे कृत्य केले होतं. बाळाचे वडील हे शिक्षक असून चौथ्या अपत्यामुळे नोकरी जाण्याची भीती त्यांना होती. नोकरी जाईल या भीतीने त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आलीय. शिक्षकानेच पोटच्या लेकराला जंगलात फेकून दिल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.