गोव्यात दरवर्षी १२ मुली कुमारी माता; तज्ज्ञांनी व्यक्त केली लैंगिक शिक्षणाची गरज

सध्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली 'चांगला स्पर्श, वाईट स्पर्श' एवढेच शिकवले जाते.
teenage pregnancy
teenage pregnancygoogle

मुंबई : गोव्यात दरवर्षी १२ मुली कुमारी माता होतात. वेळीच पावले उचलली गेली नाहीत तर हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लैंगिक शिक्षण शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची सूचना तज्ज्ञांनी केली आहे.

teenage pregnancy
लैंगिक आरोग्याबाबत शिक्षण हवेच !

सध्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली 'चांगला स्पर्श, वाईट स्पर्श' एवढेच शिकवले जाते. किशोरवयीन मुला-मुलींना स्वत:विषयी जागरूक करण्यासाठी लैंगिक शिक्षण देण्याची गरज व्यक्त करतानाच प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रद्धा पाटील म्हणाल्या, "आपण त्यांना स्वत:ची काळजी घेण्यास शिकवले पाहिजे. उपचारात्मक उपायांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाय केव्हाही चांगलेच".

teenage pregnancy
लैंगिक शिक्षणाबद्दल 'शिक्षण' विभागालाच गांभीर्य नाही

असुरक्षित लैंगिक संबंधांचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात हे समजावून सांगण्यासाठी किशोरवयीन मुलांना लैंगिक शिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. "असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याचा परिणाम म्हणून भविष्यात प्रौढ वयात गर्भधारणा करत असताना मुलीला प्रजनन क्षेत्रात संसर्ग किंवा अडचणी येऊ शकतात. किशोरवयीन मुलीने गर्भपात केल्यानंतर वंध्यत्वाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लैंगिक संबंधांमुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता असते", असे प्रजनन तज्ज्ञ डॉ. गौरी गौण यांनी सांगितले.

teenage pregnancy
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार

प्रतिष्ठेच्या चिंतेपायी अनेकदा पालक खासगी रुग्णालयात मुलींना दाखल करतात आणि गर्भपात घडवून आणतात. खरेतर अशी प्रकरणे गोवा बालके कायद्यांतर्गत बलात्कार म्हणून गणली जातात. पालक आणि डॉक्टर यांच्यातील परस्पर सामंजस्याने ही प्रकरणे दडवली जातात. लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती करण्यात आली नसेल तर तो कायद्यानुसार बलात्कार ठरतो; मात्र पालकांना याबाबत कुठेही वाच्यता करण्याची इच्छा नसल्याने संबंधित मुलाबाबत तक्रार केली जात नाही, असे एका स्त्रीरोगतज्ज्ञाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com