Bihar Election : 'तेजस्वी भव: बिहार'; तेजप्रताप यादवांनी दिला लहान भावाला आशीर्वाद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

तेजप्रताप यादव यांनी समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपुरमधून निवडणूक लढवली आहे.

पाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. नुकतीच मतमोजणी सुरु झाली आहे. आणि सध्या मातमोजणीचे कल येऊ लागले आहेत ज्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महागठबंधन आघाडीवर दिसून येत आहे. सध्या 38 जिल्ह्यातील 55 मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. नितीश कुमार सत्ता राखतील की सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव बाजी मारतील, याचा निर्णय आज स्पष्ट होईलच. मात्र, मतमोजणी सुरु असतानाच आता तेजस्वी यादव यांचे मोठे भाऊ आणि बिहारच माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी ट्विट करुन आपल्या लहान भावाला एकप्रकारे आशीर्वादच दिला आहे. 

हेही वाचा - Bihar Election : 'महागठबंधनला लाडू पचणार नाहीत'; भाजपकडून छातीठोक दावा

त्यांनी या ट्विटमध्ये 'तेजस्वी भवः बिहार!' असं म्हटलं आहे. तेजप्रताप यादव हे तेजस्वी यादव यांचे मोठे बंधू आहेत. सध्या 243 जागांसाठी बिहार विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात पार पडल्या आहेत. 28 ऑक्टोबर रोजी 71 जागांसाठी, 3 नोव्हेंबर रोजी 94 जागांसाठी तर 7 नोव्हेंबर रोजी 78 जागांसाठी मतदान पार पडले. या मतदानानंतर आलेल्या एक्झीट पोल्समध्ये सगळीकडे महागठबंधनलाच आघाडी मिळणार असल्याचे अंदाज आले आहेत. तेजस्वी यादव यांनी स्वत:ला मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. 

हेही वाचा - MP By election live updates: भाजपा सत्ता राखणार का?
वैशाली जिल्ह्यातील राघोपुर जागेवरुन तेजस्वी यादव निवडणुकीच्या मैदानात आहेत. याच जागेवरुन आधी लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. तेजप्रताप यादव यांनी समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपुरमधून निवडणूक लढवली आहे. नितीश कुमार हे विधानसभा सदस्य आहेत, त्यांनी निवडणूक लढवली नाहीये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tejashwi bhav bihar said tejpratap yadav in his tweet