Telangana Election : ''केसीआर यांची चौकशी का होत नाही?'', राहुल गांधींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

rahul gandhi on kcr
rahul gandhi on kcresakal

भुपालपल्ली (तेलंगणा)- ‘‘ तेलंगणमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जातीनिहाय सर्वेक्षण केले जाईल. यामुळे केसीआर यांच्या कुटुंबाने तेलंगणला नेमके किती लुटले? याचा तपशील समजू शकेल,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केले.

छत्तीसगड, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये आम्ही याआधीच जातीनिहाय सर्वेक्षण सुरू केले असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल यांच्या ‘विजयभेरी यात्रे’ला आज येथून प्रारंभ झाला. या निमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. देशामध्ये विरोधकांच्या मागे चौकशी लावली जाते, मात्र केसीआर यांची चौकशी का होत नाही? असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

राहुल म्हणाले, ‘‘ पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री केसीआर हे जेव्हा भाषण द्यायला सुरूवात करतील तेव्हा त्यांना राज्यामध्ये आपण जातीनिहाय सर्वेक्षण कधी करणार? असा प्रश्न विचारायला हवा.’’ विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल हे सध्या तीन दिवसांच्या तेलंगण दौऱ्यावर आले असून गुरुवारी त्यांनी विजयभेरी यात्रेच्या माध्यमातून थेट लोकांशी संवाद साधला.

rahul gandhi on kcr
Youngest Organ Donor: चार दिवसांचं बाळं बनलं भारतातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता; ६ जणांचे वाचवले प्राण

‘‘ सध्या जातीनिहाय सर्वेक्षण हाच केवळ भारतातील संवेदनशील विषय आहे. अशाप्रकारच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समाजातील अनुसूचित जाती आणि जमाती तसेच मागास घटकांच्या प्रमाणावर एक्स रे टाकला जाईल. केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही देशभर अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले असून काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत तशा प्रकारचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. आमच्याकडे सत्ता आल्यानंतर कायदा करून आरक्षणावरील पन्नास टक्क्यांची मर्यादाही हटविण्यात येईल,’’ असे राहुल म्हणाले.

rahul gandhi on kcr
Rajasthan Polls: मला मुख्यमंत्रीपद सोडायची इच्छा आहे, पण...; अशोक गेहलोतांनी सचिन पायलट यांना खिजवलं

देशात पाच टक्केच ओबीसी आहेत का?

‘‘केंद्रातील भाजपच्या सरकारने उद्योजक गौतम अदानी यांचे कर्ज माफ केले असून गरीब शेतकरी आणि कामगारांचे कर्जमात्र माफ केले जात नाही. देशाचे पाच टक्के बजेट हे केवळ ओबीसींकडून निश्चित केले जात असेल तर देशामध्ये केवळ पाच टक्केच ओबीसी आहेत का? असा सवाल मी मोदी आणि केसीआर विचारतो आहे. राज्यातील केसीआर यांचे सरकार सर्वाधिक भ्रष्ट सरकार असून केवळ एकाच कुटुंबाकडून ते चालविले जाते. एका कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता गेल्यामुळे नेमके काय होते? याची फळे राज्यातील जनता भोगत आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com