
Gay relationship dispute murder
ESakal
इंटरनेटमुळे लोकांचे जीवन सोपे झाले आहे. त्यांना जे काही शिकायचे आहे ते फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे. पण जेव्हा हेच इंटरनेट चुकीच्या हातात पडते तेव्हा ते तितकेच धोकादायक ठरू शकते. याचे एक ताजे उदाहरण तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातून समोर आले आहे. ही कहाणी आहे परिमी अशोक नावाच्या एका तरुणाची. ज्याने YouTube व्हिडिओ पाहून मृतदेह कसा कापायचा? त्याची विल्हेवाट कशी लावायची हे शिकले. एकेकाळची मैत्री हळूहळू भयानक खुनात बदलली. या घटनेने खळबळ उडाली आहे.