esakal | भारताची पहिला महिला मायक्रो-आर्टिस्ट स्वरिका; तांदळाच्या दाण्यावर चितारली भगवद्गीता 
sakal

बोलून बातमी शोधा

Swarika micro artist

हैद्राबादमधील एका लॉ स्टूडंटने 4042 तांदळ्यांच्या दाण्यांवर संपूर्ण भगवद्गीता लिहली आहे.

भारताची पहिला महिला मायक्रो-आर्टिस्ट स्वरिका; तांदळाच्या दाण्यावर चितारली भगवद्गीता 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हैद्राबाद : लहानपणी प्रत्येकजणच चित्रे काढून आपल्या अंगातील कला व्यक्त करत असतो. काहींचा हा चित्रे काढण्याचा छंद पुढेही टिकून राहतो. कागदावर अथवा कॅनव्हासवर चित्रे काढलेली आपण ऐकलीच असतील  पण तांदळाच्या दाण्यावर चित्रे काढलेली एक युवती भारतात आहे, असं तुम्हाला सांगितलं गेलं तर? धक्का  बसेल ना? पण आता तांदळाच्या दाण्यांवरही कला साकारणारी एक युवती भारतात आहे. 

हेही वाचा - दोन अतिरेक्यांचा खात्मा; शोपियांमधील सर्च ऑपरेशन यशस्वी
हैद्राबादमधील एका लॉ स्टूडंटने 4042 तांदळ्यांच्या दाण्यांवर संपूर्ण भगवद्गीता लिहली आहे. या युवतीचं असं म्हणणं आहे की, ती देशातील पहिला महिला मायक्रो-आर्टिस्ट आहे. या युवतीने अलिकडेच आपला मायक्रो आर्ट प्रोजेक्ट तयार केला ज्यात तिने तांदळाच्या दाण्यांवर सगळीच्या सगळी भगवद्गीताच चितारली आहे. मायक्रो आर्टिस्ट रामागिरी स्वरिकाचं म्हणणं आहे की हा प्रोजेक्ट पूर्ण करायला तीला जवळपास 150 तासांचा वेळ लागला. मी आतापर्यंत 2 हजारांहून जास्त मायक्रो आर्टवर्क बनवले आहेत. मी मिल्क आर्ट, पेपर कार्व्हींग आणि तीळाच्या बीयांवरही चित्रे साकारली आहेत.  याआधी रामागिरी स्वरिकाने केसांवर संविधानाची प्रास्ताविका लिहली होती. ज्यासाठी तेलंगाणाच्या राज्यपालांद्वारे तिला सन्मानितही केलं गेलं होतं. स्वरिकाने म्हटलं की राष्ट्रीय स्तरावर माझ्या कामाला ओळख मिळाल्यानंतर आता मी माझ्या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी तयार आहे. 

स्वरिकाने सांगितलं की, मला नेहमीच कला आणि संगीतामध्ये रुची राहीलेली आहे आणि यासाठी मला लहानपणापासूनच अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी मी तांदळाच्या दाण्यांवर गणपतीचे चित्र चितारुन मायक्रो आर्ट करायला सुरवात केली. त्यानंतर मग मी तांदळाच्या एकाच दाण्यावर इंग्रजी वर्णमाला लिहली. 2019 मध्ये रामागिरीला दिल्लीच्या सांस्कृतिक अकॅडेमीकडून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. या पुरस्काराने त्यांना भारताची पहिली महिला मायक्रो आर्टिस्ट म्हणून मान्यता मिळाली.  

हैही वाचा - नितीश कुमारांनी चिराग यांच्यावर अन्याय केला; तेजस्वींच्या सहानुभूतीने नव्या चर्चांना उधाण

स्वरिका यांनी म्हटलं की, मला 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑर्डर बुक ऑफ रेकॉर्डसने सन्मानित केलं आणि 2019 मध्ये मला उत्तर दिल्ली सांस्कृतिक अकॅडेमीकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आतापर्यंत मी 2000 हून अधिक मायक्रो आर्ट्सवर काम केलं आहे. स्वरिकाने म्हटलं की, लॉची विद्यार्थीनी असल्याने तिला एक न्यायाधीश बनायचे आहे तसेच अनेक महिलांना प्रेरणा द्यायची आहे. स्वरिकाची आई लताने म्हटलं की, माझ्या मुलीकडे लहानपणापासूनच कला आणि संगीताबद्दल आस्था आहे. आणि आता या क्षेत्रात तिची मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने दखल घेतली जाता आहे हे पाहून मी आनंदी आहे.