दोन अतिरेक्यांचा खात्मा; शोपियांमधील सर्च ऑपरेशन यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

ही मोहीम भारतीय सैन्य आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रितपणे राबवली आहे.

जम्मू आणि काश्मिर : सोमवारी दुपारपासून जम्मू आणि काश्मिरमधील शोपियां जिल्ह्यात अतिरेक्यांचे सर्च ऑपरेशन सुरु  होतं. या सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी आज मंगळवारी दिली आहे. ही मोहीम भारतीय सैन्य आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रितपणे राबवली आहे. ऑपरेशन अंतर्गत आज दुसरा अतिरेकी मारला गेला आहे. 

हेही वाचा - नितीश कुमारांनी चिराग यांच्यावर अन्याय केला; तेजस्वींच्या सहानुभूतीने नव्या चर्चांना उधाण

 

या भागात अतिरेकी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. ही माहिती मिळताच सैन्याने अतिरेक्यांचे सर्च ऑपरेशन सुरु केले. अधिकाऱ्यांनी या सर्च ऑपरेशनविषयी माहिती देताना म्हटलं की झेनपोराच्या मेल्होरा या भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळताच सैन्याने या भागाला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु केलं आणि मग या कारवाईस सुरवात झाली. या अतिरेक्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांवरही गोळीबार केला. या चकमकीत सैन्याने अतिरेक्यांचा एन्काऊंटर केला आहे. काल एका अतिरेक्याला मारल्यानंतर आज एका अतिरेक्याला मारण्यात सैन्याला यश आलं आहे. 

हेही वाचा - कृषी विधेयकाची प्रत न मिळाल्यामुळे आप आमदारांनी विधानसभेत घालवली रात्र

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यातील एक अतिरेकी काल सोमवारी मारला गेला आहे. या मोहिमेत सुरक्षा अधिकाऱ्यांनी एक AK असॉल्ट रायफल आणि एक पिस्तूल हस्तंगत केले आहे. हे ऑपरेशन आता संपुष्टात आले आहे, असं सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two terrorist killed in j&K shopian district in search operation says army spokesperson