''तू चांगली दिसत नाही'', अ‌ॅसिड पिण्यास भाग पाडल्याने गर्भवती पत्नीचा मृत्यू

Telangana Crime News
Telangana Crime Newssakal

हैदराबाद : पतीने शौचालय स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे अ‌ॅसिड गर्भवती पत्नीला जबरदस्तीने प्यायला लावले. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. निजामाबाद (Nizamabad) जिल्ह्यातील वारणी येथील राजपेठ इथं ही घटना घडली. आरोप फरार असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Telangana Crime News
फसवणूकप्रकरणी पती-पत्नीचा जामीन फेटाळला

कल्याणी, असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी तरुणचं गेल्या चार वर्षांपूर्वी कल्याणीसोबत लग्न झालं होतं. गेल्या तीन महिन्यांपूर्वी कल्याणी गर्भवती झाली. त्यानंतर तरुणनं तू चांगली दिसत नाही असं म्हणत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच हुंड्यासाठी देखील तिचा छळ करत होता. यावरून त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडत होते. दोघांमध्ये मंगळवारी देखील वाद झाला. त्यानंतर तरुणनं तिला शौचालय स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे अॅसिड प्यायला लावले. त्यामुळे ती आजारी पडली. तिच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी तिला निजामाबाद येथील रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, तिचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर कल्याणीच्या नातेवाईकांनी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली. तो हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच तिला जबरदस्तीने अॅसिड प्यायला लावल्याने तिचा मृत्यू झाल्याचं त्यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार वारणी पोलिसांनी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी तरुण फरार असून वारणी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com