Tele Law Services : गरिबांना मोफत कायदेशीर मदत पुरवणारी टेली लॉ सेवा काय आहे?

न्याय विभागाने सन 2017 मध्ये टेली लॉ सेवा सुरू केली
Tele Law Services
Tele Law Services esakal

Tele Law Services : न्याय विभागाने सन 2017 मध्ये टेली लॉ सेवा सुरू केली. यामध्ये देशभरात पसरलेल्या 2.50 लाख सामान्य सेवा केंद्रांची मदत घेण्यात आली. गरीब, एससी-एसटी समुदायातील लोकांना कायदेशीर मदत देणे हा त्याचा उद्देश होता. तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.

टेलि लॉ सेवा सध्या चर्चेत आहे. चर्चेचे कारण म्हणजे त्याचे रेडिओ जिंगल ऑल इंडिया रेडिओच्या सर्व 272 केंद्रांद्वारे लोकांना जागरूक करत आहे. जेव्हा जेव्हा लोकांना कायदेशीर मदतीची आवश्यकता असेल तेव्हा त्यांनी जवळच्या सामान्य सेवा केंद्राशी संपर्क साधायला हवा यासाठी प्रेरणा दिली जात आहे. केंद्र सरकारचा हा उपक्रम चर्चेद्वारे प्रकरणे निकाली काढण्यासाठी आहे, जेणेकरून गरिबांना पोलिस स्टेशन कोर्ट कचेऱ्या कराव्या लागणार नाहीत.

Tele Law Services
Health Care: साष्टांग नमस्कार करण्याचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या

त्याचा परिणामही दिसून येत आहे. या मोहिमेअंतर्गत, सुरुवातीपासून ते 31 जुलै 2023 पर्यंत 48.11 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली होती आणि त्यापैकी 47.52 लाख प्रकरणं निकाली निघाली. जर या 48.11 लाखांहून अधिक प्रकरणांपैकी निम्मी प्रकरण न्यायालयांत पोहोचली असती तर न्यायालयांवर किमान 24 लाख खटल्यांचा अतिरिक्त भार पडला असता. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी मानला जातोय.

Tele Law Services
PM Modi on Health Emergency: "आगामी आरोग्य आणीबाणीसाठी तयार राहा"; PM मोदींनी का केलंय हे आवाहन?

टेलि लॉ सेवा कधी सुरू झाली?

न्याय विभागाने 2017 मध्ये टेली लॉ सेवा सुरू केली. यामध्ये देशभरात पसरलेल्या 2.50 लाख सामान्य सेवा केंद्रांची मदत घेण्यात आली. गरीब, एससी-एसटी समुदायातील लोकांना कायदेशीर मदत देणे हा त्याचा उद्देश होता. यामध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची मदत घेण्यात आली. यासाठी रेडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Tele Law Services
Sadhguru Health Tips : या पदार्थांसमोर नॉन व्हेजही फेल, प्रोटीन मिळवण्यासाठी खुद्द सद्गुरु खातात या 3 गोष्टी

सुरुवातीला या योजनेची प्रगती संथ होती परंतु आता देशभरातील लोक त्यांच्या कायदेशीर समस्यांसाठी त्यांच्या जवळच्या CSC मध्ये पोहोचत आहेत. सरकारने नामनिर्देशित केलेले वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत आणि सूचना देत आहेत. आता सरकारने टेलि लॉ मोबाईल अॅपही बनवले आहे. या अॅपद्वारे कोणतीही व्यक्ती कायदेशीर मदतही घेऊ शकते.

Tele Law Services
Health Tips : मधुमेह असलेल्यांना भात खाण्याची योग्य पद्धत माहितीच नाहीय? म्हणून तर आजार वाढतच चाललाय

मदत कशी मिळवायची?

तुम्हालाला कायदेशीर मदत हवी असल्यास, त्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. तेथे केंद्र प्रभारी केस ऐकून तुमची केस नोंदवतील. मग सरकारकडून तुम्हाला वकील दिला जाईल. तुम्हाला याचीही माहिती दिली जाईल आणि वकील कधी ऑनलाइन उपलब्ध होईल हे सांगितलं जाईल. त्यानंतर वकिलाशी बोलण्यासाठी तुम्हाला पुन्हा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये यावे लागेल. तुम्ही तुमची समस्या वकिलाला सांगाल. ते ऐकून आणि समजून घेऊन ते तुम्हाला कायदेशीर मदत करतील.

Tele Law Services
Vidarbha Travels Burned : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 25 जणांचा मृत्यू, 4 मुलांचाही समावेश

जर तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जायचे नसेल, तर सरकारने यासाठी टेलि लॉ हे मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे, जिथे नोंदणी केल्यानंतर तेच वकील तुम्हाला घरी बसून मदत करतील. फक्त तुमच्या फोनमध्ये चांगले इंटरनेट कनेक्शन लागेल. नेटवर्कची समस्या असल्यास, कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाणे कधीही चांगले.

Tele Law Services
Travel Tips: ...तरच ट्रिप होईल बेस्ट; ट्रिप प्लॅन करण्याआधी या गोष्टींचा विचार करा

गरिबांवर लक्ष केंद्रित करून सेवा सुरू केली?

सुप्रीम कोर्टाचे वकील अश्वनी दुबे म्हणतात की, विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 मध्ये अशी तरतूद आहे की सरकार गरीब, दलित आणि मागासलेल्या लोकांना सार्वत्रिक न्यायासाठी मदत करेल. यासाठी सरकारने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना केली. कालांतराने त्याचे युनिट तालुका स्तरापर्यंत सुरू करण्यात आले, ते आजही सुरू आहेत. ज्यांच्याकडे माहिती आहे, तेही त्याचा फायदा घेत आहेत.

Tele Law Services
MSRTC Bus Travel: 15 कोटी ज्येष्ठांकडून लालपरीची सवारी! लातूर विभागातील ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

टेली लॉ सेवा सरकारने 2017 मध्ये सुरू केली होती. कारण तेव्हा देशात इंटरनेट सुविधा चांगली झाली होती. त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. ही मोहीम उपयुक्त ठरत आहे कारण सरकारकडे देशभरात 2.50 लाख सामान्य सेवा केंद्रे उपलब्ध आहेत. येथे पोहोचल्यानंतर कोणतीही व्यक्ती स्वतःची नोंदणी करेल. त्यामुळे त्याला वकिलाचा वेळ मिळेल. त्याची माहिती मोबाईलवरही देण्याची व्यवस्था आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com