लग्नाच्या बसचा भीषण अपघात; घटनास्थळीच चौघांचा मृत्यू

road accident
road accidentroad accident
Updated on

बक्सर-आरा मुख्य मार्गावरील कृष्णब्रह्मजवळ बस आणि स्कार्पिओमध्ये भीषण अपघात (Terrible bus accident) झाला. यात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू (Four died on the spot) झाला. तसेच अनेक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आरोग्य विभाग घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी नागरिकांना जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बस ब्रह्मपूरकडून येत होती. बक्सर-आरा मुख्य मार्गावरील कृष्णब्रह्मजवळ स्कॉर्पिओ आणि बसची जोरदार धडक झाली. या घटनेत चालक सुमित पांडे, संजय सिंग यांच्यासह चौघांचा मृत्यू (Four died on the spot) झाला. डुमराव उपविभागातील धरहरा गावातील सुरेंद्र साह यांच्या मुलाच्या लग्नातून ही बस निघाली (Terrible bus accident) होती.

road accident
मोठी बातमी : कोव्हॅक्सिनचे अमेरिकेत होणार मूल्यांकन; भारत बायोटेकची माहिती

अपघाताचा आवाज ऐकून एकच गोंधळ उडाला. जखमींना प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना जिल्हा मुख्यालयात पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच डुमरावचे आमदार अजित कुमार यांनी रुग्णालय गाठले. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com