पुलवामामध्ये पुन्हा चकमक; एक जवान शहीद तर एक दहशतवादी ठार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आज (ता. ०७) पुन्हा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून एक भारतीय जवान शहीद झाला आहे. दरम्यान, पोलिस आणि सुरक्षा दलाने ही संयुक्तपणे कारवाई केली. गुसू भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या हाती आल्यानंतर त्यांनी या भागाला घेरले होते यादरम्यान ही चकमक झाली आहे. 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आज (ता. ०७) पुन्हा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून एक भारतीय जवान शहीद झाला आहे. दरम्यान, पोलिस आणि सुरक्षा दलाने ही संयुक्तपणे कारवाई केली. गुसू भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या हाती आल्यानंतर त्यांनी या भागाला घेरले होते यादरम्यान ही चकमक झाली आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनी गोळीबार सुरु केला. यात १ दहशतवादी ठार झाला. तर एक जवान शहीद झाला आहे. या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाचे जवान त्यांचा शोध घेत आहेत.
-------------
चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
-------------
भारत-चीन युद्ध झाल्यास अमेरिका मैदाना उतरणार; व्हाईट हाऊसची घोषणा
-------------
दरम्यान, यापूर्वीही ५ जुलै या दिवशी पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. राखीव पोलिस दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट करत हल्ला केला होता. या स्फोटानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorist neutralised in encounter in Pulwama