esakal | काश्‍मीरवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उद्‌ध्वस्त । Kashmir
sakal

बोलून बातमी शोधा

काश्‍मीरवरील दहशतवादी  हल्ल्याचा कट उद्‌ध्वस्त

काश्‍मीरवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उद्‌ध्वस्त

sakal_logo
By
जावेद मात्झी -सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीनगर : काश्‍मीरमधील हल्ला करण्याच्या हेतूने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले तर दुसऱ्याला पकडले. त्याचे नाव अली बाबा बत्रा (वय १९) आहे. तो पाकिस्तानमधील पंजाबच्या ओकारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. लष्कराने केलेल्या कारवाईत एका आठवड्यात सात दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती १९ व्या पायदळ विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी दिली.

हेही वाचा: ‘अभियांत्रिकीचा निकाल लवकर लावा’

ते म्हणाले, नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याऱ्या आमच्या पथकाला घुसखोरांच्या हालचाली जाणवल्याने १८ सप्टेंबरच्या रात्रीपासून शोध मोहिमेला सुरुवात केली. स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सहा जणांचा गट घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आले. दोन घुसखोर कुंपण ओलांडून आले. अंधाराचा फायदा घेऊन चौघांनी पाकिस्तानच्या बाजूने पळ काढला. दोघांना घेराव घालण्यासाठी अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती.

नियंत्रण रेषेवर लष्कराने केलेल्या कारवाईत गेल्या आठवड्यात सात दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांकडून सात एके रायफल, नऊ पिस्तूल व रिव्हॉल्व्हर, विविध प्रकारचे ८० ग्रेनेड तसेच भारच व पाकिस्तानचे चलन जप्त केले आहे.- मेजर जनरल वीरेंद्र वत्स

loading image
go to top