

दहशतवादविरोधी कारवायांच्या तीव्रतेदरम्यान सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत काश्मीर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांची आणखी चार घरे उडवून दिली. तर जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली. मारला गेलेला व्यक्ती एक सामान्य नागरिक होता. ज्याचा भाऊ काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेला होता आणि तो लष्करमध्ये सामील आहे.