#TerroristsInKarnataka : कर्नाटक दहशतवादाचा ट्विटरवर ट्रेंड

वृत्तसंस्था
Saturday, 18 January 2020

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातीस हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कर्नाटकातील बेळगावात गेलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. यावरून आता चांगलाच गदारोळ उठला आहे.

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातीस हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कर्नाटकातील बेळगावात गेलेल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. यावरून आता चांगलाच गदारोळ उठला आहे. यावरून महाराष्ट्राने कठोर भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी या गोष्टीचा निषेध करत हा कर्नाटक सरकारचा एकप्रकारचा लोकशाहीला काळीमा फासण्याचाच प्रकार असल्याचे म्हटले आहे. 

सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक नेत्यांनी या बाबीचा तीव्र निषेध केला आहे. 

#SaturdayMotivation अन् तिने केले पुरूष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व...

यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी निषेध व्यक्त करताना मी बेळगावात येत आहे, बघू असे ट्विट केले आहे. यामुळे आज बेळगावमध्ये पुन्हा वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.   भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी १७ जानेवारी १९५६ यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते.

यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली.

भाजपचे ‘अब तक सत्तावन’

यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. यासाठी गेलेल्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेबाहेर सोडले. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे. यावर महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलीसांची धक्काबुक्की केली. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्या पासून रोखले. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय? असा प्रश्न महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना विचारला आहे. तसेच मी बेळगावला जात आहे. पाहू काय घडतंय, असे म्हणत इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TerroristsInKarnataka Karnataka Terrorism Trends on Twitter