धक्कादायक! प्रेयसीला रात्री तीन वाजता केला फोन अन् ...

प्रेयसीनं आपला कॉल उचलला नाही म्हणून तरूणाने रागाच्या भरात धक्कादायक कृती केली.
Suicide
Suicide Sakal

प्रेमाच अन् युद्धात सर्व काही क्षम्य असते असं म्हणतात. प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात. काही जण तर जीव द्यायलाही तयार असतात. त्यात सध्या सध्या प्रेमाचा आठवडा अर्थात व्हॅलेन्टाईन वीक (Valentine Week) चालू आहे. त्यामुळे सध्या प्रेमींचा अक्षरश: ऊत आलाय. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका मुलाने रात्री तीन वाजता आपल्या प्रेयसीला (Girlfriend) फोन केला. तिनं फोन न उचलल्याने त्याने 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. (The boyfriend tried to commit suicide as his girlfriend did not pick up the phone)

Suicide
धक्कादायक! बनावट आधारकार्ड बनवून अल्पवयीन मुलीवर वर्षभर बलात्कार

मलेशियातील शाह आलम येथे ही घटना घडली आहे. 'वर्ल्ड ऑफ बझ'च्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय 28 वर्षे सांगण्यात येत आहे. तो एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये (Relationship) होता. दरम्यान काही कारणास्तव दोघेही वेगळे राहत होते. 8 फेब्रुवारी रोजी रात्री तीन वाजता त्याने प्रेयसीला फोन केला असता तिने मुलाचा फोन उचलला नाही.

त्यानंतर मुलाला इतके वाईट वाटले की, तो स्वतःवरच नियंत्रण गमावून बसला आणि रागाच्या भरात त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो 18 व्या मजल्यावर चढला. परंतु कोणीतरी त्याला उडी मारण्याचा प्रयत्न करताना पाहिलं, अन् पोलिसांना कळवले. पोलिसांना बचाव पथकाने तत्काल तिथे येऊन मुलाला शांत केले आणि खाली आणले. नंतर या घटनेची माहिती त्याच्या मैत्रिणीलाही दिली.

Suicide
लव्ह जिहादनंतर आता लँड जिहाद! जाणून घ्या काय आहे प्रकार

सध्या त्याला खाली उतरवण्यात आले असून तो सुखरूप असल्याचेही सांगण्यात आले. कोणत्याही घटनेमुळे तरुण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मोठे निर्णय घेतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर तरुणाला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com