कलियुगातील श्रावणबाळ! आजोबांना कावडीत बसवून घडवली तीर्थयात्रा

Prayagraj Pilgrimage: मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) दोघा भावांनी आपल्या आजोबांची तीर्थस्नानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना खांद्यावर बसवून थेट प्रयागराज गाठले.
Prayagraj Pilgrimage
Prayagraj Pilgrimage esakal

आपण श्रावणबाळाबद्दल (Shravanbal) ऐकले असेलच! अलीकडच्या काळात आपल्या मात्यापित्यांचा, आपल्या वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवणारी मुले क्वचितच दिसतात. पण आपण अशा दोन भावांबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या वृद्ध आजोबांना (Grandfather) खांद्यावर घेऊन तीर्थस्नान करण्यासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथे पोहोचले. हे दोन्ही भाऊ मध्य प्रदेशातील रेवा (Reva, Madhya Pradesh) येथील रहिवासी आहेत. हे दोघे आपल्या आजोबांना घेऊन तीर्थस्नानासाठी (Pilgrimage) एवढ्या दुरुन आल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. (The brothers reached Prayagraj from MP to fulfill their grandfather's wish of pilgrimage.)

Prayagraj Pilgrimage
Video: कन्हैय्या कुमारवर अ‍ॅसिड हल्ला

विष्णू आणि शंकर अशी या आधुनिक श्रावणबाळांची नावे आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांचे त्यांच्या आजोबांवर खूप प्रेम आहे आणि त्यांना त्यांची सेवा करायला आवडते. ते याला आपला धर्म आणि कर्तव्य मानतात. त्यानी सांगितले की, त्यांच्या आजोबांना तीर्थस्नान करण्याची इच्छा होती. त्यामुळे दोघांनीही त्याची इच्छा पूर्ण करण्याचा विचार केला. मग दोघंही आजोबांना खांद्यावर बसवून रेवाहून प्रयागराजला पोहोचले.

Prayagraj Pilgrimage
भारताचं राष्ट्रगीत टांझानियाच्या भावंडांनी गायलं; Video Viral

माघ मेळ्यातील तिसरे सर्वात मोठे स्नानपर्व मौनी होते. मौनी अमावस्येदिवशी अनेक भक्त ब्रह्म मुहूर्तापासून त्रिवेणी संगमात श्रद्धेने स्नान करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक संगमाच्या विविध घाटांवर स्नान करतात. या दिवशी या दोन नातवांनी आपल्या आजोबांना तीर्थयात्रा घडवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com