Varun Gandhi : भाजपमधील गांधी पर्वाचा शेवट, वरुण गांधी यांना उमेदवारी नाकारणार असल्याची चर्चा

आता या दोघांची भाजप मधील कारकीर्द अंतिम टप्प्यावर आल्याचे स्पष्ट
Varun Gandhi
Varun Gandhiesakal

नवी दिल्ली : भाजपमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय असलेल्या नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्या आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी व खासदार वरुण गांधी यांच्या भाजपाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेऊन गांधी कुटुंबातील या सदस्यांना भाजपशी जोडले होते. मात्र आता या दोघांची भाजप मधील कारकीर्द अंतिम टप्प्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Varun Gandhi
Child Health : वयाच्या सहाव्या वर्षानंतरही तुमचं मूल बोबडं बोलतं का? हे उपाय नक्की करा ट्राय

इंदिरा गांधी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मनेका गांधी यांनी घर सोडले होते. त्यांनी अमेठीतून राजीव गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होते. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील पिलिभीत हा मतदारसंघ निवडला आणि तेथून १९८९ मध्ये पहिल्यांदा जनता दलाच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून खासदार म्हणून निवडून आल्या. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या. त्यानंतर त्या सतत त्याच मतदारसंघातून निवडून आल्या. परंतु १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपदही भूषविले. यूपीएच्या काळातही त्या पिलिभीत मतदारसंघातून निवडून आल्या.

Varun Gandhi
Summer Health Care Tips : उन्हाळ्यात शरीरातील पाणी टिकविणे महत्त्वाचे! अशी घ्या आरोग्याची काळजी

वरुण गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे रा. स्व. संघाचे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यामुळे अवघ्या ३३ व्या वर्षी ते भाजपचे महासचिव झाले होते. परंतु मोदी सत्तेत आल्यानंतर गांधी कुटुंबातील या सदस्यांचे भाजपशी असलेला संबंध कमी झाला. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात मनेका गांधी यांना मंत्रिपद मिळाले परंतु दुसऱ्या कार्यकाळात त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. याच काळात वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेश व मोदी सरकारवर समाज माध्यमे व वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली.

सीईसीमध्येही विरोध

एकेकाळी उत्तरप्रदेशचे भावी मुख्यमंत्री म्हणून पुढे आलेले वरुण गांधी यांचा आलेख खाली जाऊ लागला. यामुळे आता भाजपमधून त्यांची गच्छंती जवळपास निश्चित मानली जात आहे. दिल्लीतील केंद्रीय निवडणूक समितीमध्येसुद्धा वरुण गांधी यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली. सरकारच्या विरोधात मते व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास योग्य संदेश जाणार नाही, असा दावा या नेत्यांनी केला. वरुण गांधी यांना उमेदवारी न देण्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. कदाचित मनेका गांधी यांना सुलतानपूर येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापही सुलतानपूर व पिलीभीत या दोन्ही मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर न केल्यामुळे या भाजपतील गांधी पर्वाचा शेवट आता होण्यास सुरूवात झाल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com