Strawberry Cultivation : शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून कमावले दीड कोटी रुपये, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

उत्तरप्रदेशातील शेतकरी पारंपारिक शेतीऐवजी मोठ्या प्रमाणावर बागायती शेती करत आहेत
Strawberry Cultivation
Strawberry Cultivation esakal

Strawberry Cultivation : आता उत्तरप्रदेशातील शेतकरी पारंपारिक शेतीऐवजी मोठ्या प्रमाणावर बागायती शेती करत आहेत. कोणी हिरव्या भाज्यांची लागवड करत आहेत, तर कोणी मशरूम आणि पपईची लागवड करत आहेत. यामुळे अनेक शेतकरी करोडपती झालेत. विशेष म्हणजे यूपीमधील अनेक शेतकऱ्यांनी आता परदेशी पिकांचीही लागवड करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे ते वर्षभरात लाखो रुपये कमवत आहेत. या शेतकर्‍यांपैकी एक म्हणजे सफिक भाई, ते मुझफ्फरनगर जिल्ह्यातील भोपा येथील रहिवासी आहे. सफिक भाई गेल्या 10 वर्षांपासून स्ट्रॉबेरी पिकवून मोठी कमाई करत आहेत.

मुरादनगर येथील गंगानगरजवळ सफिक भाई स्ट्रॉबेरीची शेती करतात. ते सांगतात की, पूर्वी ते 11 एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड करायचे. त्यामुळे भरपूर नफा झाला. यानंतर त्यांनी त्याचे क्षेत्रफळ वाढवण्याची योजना आखली. आता तो ४० एकर जमीन भाड्याने घेऊन स्ट्रॉबेरी पिकवत आहे. विशेष म्हणजे ते स्ट्रॉबेरी स्वतः विकतात. गेल्या 10 वर्षांपासून ते त्यांच्या शेतासमोरील रस्त्यावर स्ट्रॉबेरीचा स्टॉल लावत आहेत. आजूबाजूचेच नाही तर इतर जिल्ह्यातील लोकही त्यांच्या स्टॉलवर स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी येतात.

Strawberry Cultivation
Pregnancy Health Tips : गर्भधारणेदरम्यान डेंग्यूंची लागण ठरू शकते घातक; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय!

स्ट्रॉबेरीचे पीक 6 महिन्यांत तयार होते

सफिक भाईच्या म्हणण्यानुसार स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये खूप मेहनत करावी लागते. असे असूनही नफा जास्त आहे. आत्तापर्यंत त्यांनी स्ट्रॉबेरी विकून एक कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. स्ट्रॉबेरीची शेती आधुनिक पद्धतीने करत असल्याचे सफिक सांगतात. तो मल्चिंगद्वारे स्ट्रॉबेरी पिकवत आहे. सफिक म्हणाले की, ते दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरीचे रोपण करतो. स्ट्रॉबेरी पीक तयार होण्यासाठी 6 महिने लागतात. मात्र अतिवृष्टीमुळे या पिकाचेही नुकसान होते. म्हणूनच स्ट्रॉबेरीच्या शेतात पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी.

Strawberry Cultivation
Health Checkup : रेग्युलर हेल्थ चेकअप करणे का महत्वाचे आहे माहितीये? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

इतके कोटी कमावले आहेत

सफिक भाई पूर्वी हिरव्या भाज्यांची लागवड करत असत, पण त्यात त्यांना फारसा नफा मिळत नव्हता. एकदा त्यांचा मोठा भाऊ काही कामानिमित्त हिमाचल प्रदेशला गेला होता. येथे त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड पाहिली. त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे सफिक भाई यांनी सर्वप्रथम 2 एकरात स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. चांगली कमाई झाल्यावर त्यांचे मनोबल वाढले. यानंतर त्यांनी त्याचे क्षेत्र वाढवून 5 एकर केले. तसेच हळूहळू हे क्षेत्र 11 एकर झाले. सफिक भाई यांनी स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून आतापर्यंत 1.50 कोटी रुपये कमावले आहेत.

Strawberry Cultivation
Independence Day Special Health News : लोकलढ्यातून मिळाले आरोग्याला बूस्ट

एक लाख रुपयांचा नफा

ते कॅमरोज जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड करतात. यासोबतच ते 200 रुपये किलोने स्ट्रॉबेरी विकतात. सफिक भाई दिल्ली आणि मेरठच्या मंडईंमध्ये स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात 100-125 रुपये प्रति किलो दराने विकतात. एका एकरात 6000 स्ट्रॉबेरीची लागवड केल्याचे ते सांगतात. कॅमरोजची एक रोप 6 ते 8 रुपयांना मिळते. अशा प्रकारे एका एकरामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी 70 ते 75 हजार रुपये खर्च येतो. तर 6 महिन्यांनंतर एक लाख रुपयांचा नफा होतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com