भारतीय 'COVAXIN'चे मोठे यश! ऑस्ट्रेलिया सरकारने दिली मान्यता

भारतीय 'कोव्हॅक्‍सिन'ला मिळाले मोठे यश! ऑस्ट्रेलिया सरकारने दिली मान्यता
Covaxin
CovaxinSakal
Updated on
Summary

भारतात बनवलेल्या कोरोना लसीला जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप मान्यता दिली नसली तरी, ऑस्ट्रेलियन सरकारने मान्यताप्राप्त लसींच्या यादीत तिचा समावेश केला आहे.

भारतात बनवलेल्या कोरोना लसीला (Covid Vaccine) जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) अद्याप मान्यता दिली नसली तरी, ऑस्ट्रेलियन सरकारने (Australian Government) मान्यताप्राप्त लसींच्या यादीत तिचा समावेश केला आहे. प्रवाशांच्या लसीकरण स्टेटससाठी भारत बायोटेकने (Bharat Biotech) बनवलेल्या कोव्हॅक्‍सिन (Covaxin) लसीला ऑस्ट्रेलियाने मान्यता दिली आहे.

ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ फारेल यांनी ही माहिती दिली. कोव्हॅक्‍सिनला ऑस्ट्रेलियन सरकारकडून हा हिरवा सिग्नल अशा वेळी मिळाला आहे, जेव्हा स्वदेशी लसीला जागतिक आरोग्य संघटनेच्या मंजुरीसाठी अनेक आठवडे प्रतीक्षा करावी लागत आहे. या लसीला मान्यता देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आणखी काही माहिती मागवली आहे.

twitter.com/ANI/status/1455056747643617280/photo/1

जागतिक संस्था म्हणते, की आणखी काही माहिती आवश्‍यक आहे, त्याआधारेच या लसीच्या वापरास मान्यता दिली जाऊ शकते. यापूर्वी 26 ऑक्‍टोबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेची बैठक झाली होती, ज्यामध्ये या लसीला मंजुरी मिळणे अपेक्षित होते, मात्र तसे होऊ शकले नाही. आता 3 नोव्हेंबरला WHO ची बैठक होणार आहे. या बैठकीत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिन या लसीला मंजुरी मिळू शकते. याच वर्षी 19 एप्रिल रोजी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे अर्ज केला होता. ही लस भारत बायोटेकने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने विकसित केली आहे.

Covaxin
दिवाळीपूर्वीच भारतीयांनी ढकललं चीनला दिवाळखोरीत! 50 हजार कोटींचा फटका

कोविशिल्ड लसीला ऑस्ट्रेलियन सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. आतापर्यंत भारतात 90 टक्के लसी कोविशिल्डने दिल्या आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियन सरकारने फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, सिनोव्हॅक, सिनोफार्म आणि भारत बायोटेक यांच्या लसींनाही मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com