Politics : विरोधी पक्षाच्या गोटात खळबळ; 'ती' होणार बैठक पुढे ढकलली

अनेक नेत्यांच्या गैरहजेरीमुळे नितीशकुमार यांनी घेतला निर्णय
Politics
Politics Esakal

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर विरोधी पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यासंदर्भात रणनीती आखण्यासाठी येत्या १२ जूनला पाटण्यात बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलली असून ती २३ जून रोजी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

यासंदर्भातील माहिती नितीशकुमार यांनी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असल्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याऐवजी पक्षाचे प्रतिनिधित्व अन्य नेते करतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.जे. स्टॅलिन यांच्या ऐवजी द्रमुकचे प्रतिनिधींना पाठविण्यात येईल, असा संदेश दिला गेला. परंतु आता बैठक पुढे ढकलल्याने पक्षाचे महत्त्वाचे नेते हजर राहतील, अशी अपेक्षा आहे.(Latest Marathi News)

Politics
Crime News: '...म्हणून मी जगाचा निरोप घेतोय', सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या


बिगर भाजप पक्षांची मोट बांधणारे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांच्या संयुक्त बैठकीत पक्षाचे आघाडीचे नेते सामील व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. कारण संयुक्त बैठकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेते सहभागी झाल्यास या बैठकीचे गांभीर्य कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.(Latest Marathi News)

परिणामी याचा लाभ भाजपला मिळेल. त्याचवेळी या बैठकीत बडे नेते सहभागी झाले तर विरोधकांच्या भूमिकेला लवकर आकार मिळेल, असे नितीशकुमार यांना वाटते. आता नव्या बदलानुसार ही बैठक २३ जून रोजी होऊ शकते, असा अंदाज आहे. नितीशकुमार यांनी बिगर भाजप नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी पश्‍चिम बंगाल, दिल्ली, ओडिशा, झारखंड यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत.(Latest Marathi News)

Politics
Cabinet Expansions: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! भाजप, सेनेच्या 'या' आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी

काँग्रेस नेते खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटी घेतल्या आहेत. दरम्यान, या बैठकीच्या माध्यमातून विरोधकांची आघाडी काँग्रेसशिवाय शक्य नाही हे प्रादेशिक पक्षाला दाखवून द्यायचे आहे. मात्र त्याचवेळी प्रादेशिक पक्षांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे, हे देखील काँग्रेसला दाखवून द्यायचे आहे.(Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com