esakal | आईनंच बाळाला ५० हजाराला विकलं; अपहरणाचा बनाव उघडकीस
sakal

बोलून बातमी शोधा

आईनंच बाळाला ५० हजाराला विकलं; अपहरणाचा बनाव उघडकीस

आईनंच बाळाला ५० हजाराला विकलं; अपहरणाचा बनाव उघडकीस

sakal_logo
By
विनायक होगाडे

गोरखपूर : तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याचे बतावणी करत ५० हजार रुपयाला बाळाला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बेपत्ता झालेले बाळ दोन तासात शोधण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी संबंधित बाळाची आई आणि विकत घेणाऱ्या महिलेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: तृतीयपंथीयांच्या समान संधीसाठी काम करायला उत्सुक - अदर पुनावाला

गोरखनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इलाहीबाग येथील सलमा खातून नावाची महिला पोलिस ठाण्यात आली आणि तिने आपल्या तीन महिन्याचे बाळ पळवून नेल्याचे सांगितले. रसलपूर भागात एका मंगल कार्यालयाजवळ एसयूव्ही गाडीतून आलेल्या महिलेने लाल रंगाची साडी घातली होती आणि तिने बाळाला हिसकावून नेले, असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिस अधीक्षक सोनम कुपार यांनी घटनास्थळी पोलिसांना पाठवले आणि बाळाचा तपास सुरू केला. परंतु तिने अपहरण केल्याची खोटीनाटी कथानक तयार केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. कारण रसलपूर भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता खातून ही स्वत:च एका महिलेला बाळ देत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ती इ-रिक्षातून निघून गेल्याचे दिसत होते. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी बाळाला घेणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला. तेव्हा ती हुमायूंपूर रोडवर आढळून आली आणि बाळही लगेच सापडले.

हेही वाचा: 'कोरोना हे थोतांड आहे'; संभाजी भिडेंचं पुन्हा अजब विधान

पतीला सांगितले खोटे कारण

घरची स्थिती हालाखीची असल्याने तीने मुल विकण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळाचे वडील भंगार गोळा करण्याचे काम करतात. हे बाळ दत्तक घेतल्याचा दावा दुसऱ्या पालकांनी केला आहे तर अन्य लोकांनी, ते बाळ ५० हजारांच्या बदल्यात दिल्याचे सांगितले. याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चुकीची माहिती देणाऱ्या महिलेविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस म्हणाले. विशेष म्हणजे पतीला न सांगता त्या महिलेने बाळाची विक्री केली. त्यातून तिने बाळाचे अपहरण झाल्याचा बनाव रचला.

loading image