कोरोना लस नको म्हणून पोरगी चढली झाडावर; व्हायरल व्हिडीओ नक्की पाहा

Corona Vaccination Viral Video: नागरिकांच्या मनातील लसीकरणाच्या शंकेमुळे अनेक मजेशीर प्रसंग घडत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Corona Vaccination Viral Video
Corona Vaccination Viral Video Sakal

Viral Video of Vaccination: गेल्या दोन वर्षापासून कोरोनानं जगाच्या नाकीनऊ आणलंय. कोरोनाचा वाढते संक्रमण रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरण (Vaccination) हाच एक मार्ग जगासमोर आहे. मात्र लसीकरणाच्या बाबतीत लोकांच्या मनात अजूनही समज गैरसमज आहेत. त्यामुळे लोक लसीकरण घेण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र सरकारही मोठ्या नेटानं लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. यादरम्यान नागरिकांच्या मनातील लसीकरणाच्या शंकेमुळे अनेक मजेशीर प्रसंग घडत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. लस नको म्हणून एक मुलगी चक्क पळून जाऊन झाडावर चढून बसली. (The video of the girl climbing a tree because she doesn't want the corona vaccine is going viral)

Corona Vaccination Viral Video
Video: चिमुकलीच्या शिवगर्जनेनं अवघा महाराष्ट्र दुमदुमला!

वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या मदतीने सरकार घरपोच लस देण्याचे काम करत आहे. अशीच एक महिला कर्मचारी लसीकरणासाठी एका ठिकाणी गेल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. दरम्यान लशीला घाबरलेल्या एका मुलीने धूम ठोकली आणि चक्क झाडावर जाऊन बसली . सगळे तिला खाली ये सांगत असल्याचं दिसतंय, परंतु काही केल्या खाली येत नाही. शेवटी वैद्यकीय अधिकारीच तिच्या जवळ जाऊन तिला खाली बोलावते. तिच्या हाताला धरून खाली उतरवते. यादरम्यानही मुलीचे हावभाव पाहण्यासारखे झालेले दिसतात. परंतु ती अधिकारी तिला अतिशय कौशल्याने लस टोचते.

Corona Vaccination Viral Video
VIDEO: करिअरबद्दल चिमुकल्याची भन्नाट कल्पना; हसू आवरणार नाही

लसीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. Anurag Dwary या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर झाला आहे. दरम्यान हा सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com