चोराने वधू-वरासोबत काढले फोटो आणि जाताना...

वृत्तसंस्था
Friday, 23 October 2020

एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर जाऊन वधू-वरासोबत छायाचित्रे काढली. पण, जाताना साडेतीन लाख रुपयांसह अन्य वस्तू घेऊन पसार झाला. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर जाऊन वधू-वरासोबत छायाचित्रे काढली. पण, जाताना साडेतीन लाख रुपयांसह अन्य वस्तू घेऊन पसार झाला. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Video: मंत्री म्हणाले, जास्त बोलला तर गोळी मारेन...

चोराने वधूच्या आईची बॅग चोरली असून, या बॅगमध्ये साडेतीन लाख रुपये, 2 मोबाइल फोन, डायमंडचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या. बॅग चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोर लग्नामध्ये पाहुण्यासारखा वावरत असल्याचे दिसून आले. तक्रारदार उषा ठाकूर यांनी पोलिसांना सांगितले की, 'माझ्या मुलीच्या लग्नात बॅग चोरीला गेली आहे. या बॅगमध्ये दागिन्याबरोबरच अहेराचे पैसही होते.'

Video: काकांनी जेसीबीने घेतली खाजवून पाठ...

पोलिसांनी सांगितले की, 'सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर असे वाटते की तो कुटूंबातील सदस्य आहे. एवढेच नाही तर ही व्यक्ती वधूची आई तसेच वधू आणि वर यांच्याबरोबर स्टेजवरही होता. आरोपी स्टेजवर आला आणि बॅग घेऊन फरार झाला. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो बॅगेसह बाहेर पडताना दिसत आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि शेजारच्या राज्यांतील पोलिसांना फुटेज व छायाचित्रे पाठविली आहेत. याबाबत पुढील तपास करत आहोत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft attended wedding reception then stole 3 lakh rupees bag at chandigarh