Lalu Prasad on Ajit Pawar: "राजकारणात निवृत्ती नसते"; लालू प्रसाद यादवांनी अजितदादांना सुनावलं

अजितदादांच्या बंडामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ मजली आहे.
Lalu Prasad on Ajit Pawar: "राजकारणात निवृत्ती नसते"; लालू प्रसाद यादवांनी अजितदादांना सुनावलं
Updated on

नवी दिल्ली : आता वय जास्त झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? अशा शब्दांत आपले राजकीय गुरु आणि काका शरद पवार यांच्यावर भाष्य करत अजित दादांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली होती. पण यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.

राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी त्यांना सुनावलं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी देखील अजितदादांना सुनावलं आहे. (There is no retirement in politics Lalu Prasad Yadav on Ajit Pawar statement)

Lalu Prasad on Ajit Pawar: "राजकारणात निवृत्ती नसते"; लालू प्रसाद यादवांनी अजितदादांना सुनावलं
Jalgaon Crime News : धार्मीक भावनांचे Status postकरणाऱ्यांवर गुन्हा दाखल

आता अजित पवारांनी म्हटलं म्हणून शरद पवारांनी निवृत्त व्हायचं का? वय झालं म्हणून कोणी कधी राजकारणात निवृत्त होतं का? राजकारणात निवृत्ती नसते, अशा शब्दांत लालू प्रसाद यांनी अजितदादांना सुनावलं आहे. गुरुवारी नवी दिल्लीत मेडिकल चेकअपसाठी आलेले असताना मीडियाशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

Lalu Prasad on Ajit Pawar: "राजकारणात निवृत्ती नसते"; लालू प्रसाद यादवांनी अजितदादांना सुनावलं
President Draupadi Murmu: महाराष्ट्र महान राज्य, यानं देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहावं - द्रौपदी मुर्मू

दरम्यान, अजितदादांनी शरद पवारांपेक्षा वेगळी भूमिका घेतल्यानं रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर दोन दिवसांनी घेतलेल्या आपल्या गटाच्या स्वंतत्र बैठकीत आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "आता नवी पिढी पुढं येत आहे तुम्ही आशीर्वाद द्या ना! चुकलं तर सांगा अजित तुझं चुकलं. आता वय जास्त झालं ८२ झाले ८३ झालं, तुम्ही कधी थांबवणार का नाही? आम्हाला वाटतं तुम्ही शतायुषी व्हावं"

Lalu Prasad on Ajit Pawar: "राजकारणात निवृत्ती नसते"; लालू प्रसाद यादवांनी अजितदादांना सुनावलं
Uddhav Thackeray: बीएमसीची चौकशी करणार तर पीएम केअर फंडाचीही करा! उद्धव ठाकरेंची मागणी

पुढे बोलताना अजितदादा म्हणाले होते, "भाजपचे नेते ७५ व्या वर्षी निवृत्त होतात. तुम्ही पाहिलं असेल लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी. यांनी नव्या पिढीला पुढे यायला वाट करुन दिली. त्याप्रमाणं तुम्ही आम्हाला आता आशीर्वाद द्या. तुम्ही आता ८३ वर्षांचे आहात तुम्ही कुठेतरी थांबणार आहात का नाही?"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.