जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांत दिल्ली पहिल्या स्थानावर; Top 10 मध्ये मुंबईचाही समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pollution

'प्रदूषण' हा केवळ भारताचाच नाही, तर संपूर्ण जगाचा चिंतेचा विषय बनलाय.

जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांत दिल्ली पहिल्या स्थानावर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

दिल्ली : राजधानी दिल्लीमधील (Delhi) वाढत्या प्रदूषणाची (Pollution) जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलीय. तज्ज्ञांनी नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिलाय. 'प्रदूषण' हा केवळ भारताचाच नाही, तर संपूर्ण जगाचा चिंतेचा विषय बनलाय. COP26 सारख्या परिषदांमध्ये हवामान बदलावर गंभीर चर्चा होताना दिसतेय. दरम्यान, हवा गुणवत्ता आणि विविध शहरांतील प्रदूषणावर नजर ठेवणारी स्वित्झर्लंडची हवामान संस्था IQAir कडून जगातील सर्वात जास्त 10 प्रदूषित शहरांची (Worlds Most Polluted Cities) यादी जाहीर करण्यात आलीय.

हेही वाचा: 'भाजपला सोबत घेऊन NCP नं 11 जागा केल्या बिनविरोध'

या यादीत भारतातील तीन शहरांचा समावेश आहे. यात पाकिस्तान आणि चीनच्या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आलाय. दिल्ली या यादीत 556 हवेच्या गुणवत्तेसह अव्वल स्थानावर आहे. कोलकाता चौथ्या क्रमांकावर, तर मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. सर्वात खराब AQI निर्देशांक असलेल्या शहरांमध्ये पाकिस्तानमधील लाहोर आणि चीनमधील चेंगदूचा समावेश आहे.

हेही वाचा: आईनं पहिल्यांदाच खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् माय-लेकरं रातोरात..

IQAir नुसार सर्वात वाईट वायू गुणवत्ता निर्देशक आणि प्रदूषण रँकिंग असलेली दहा शहरं

1. दिल्ली, भारत (AQI: 556)

2. लाहोर, पाकिस्तान (AQI: 354)

3. सोफिया, बल्गारिया (AQI: 178)

4. कोलकाता, भारत (AQI : 177)

5. झाग्रेब, क्रोएशिया (AQI: 173)

6. मुंबई, भारत (AQI: 169)

7. बेलग्रेड, सर्बिया (AQI: 165)

8. चेंगदू, चीन (AQI: 165)

9. स्कोप्जे, उत्तर मॅसेडोनिया (AQI: 164)

10. क्राको, पोलंड (AQI : 160)

हेही वाचा: अटक केलेल्या 83 शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाखांचं 'बक्षीस'

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेनं (आयआयटीएम) सांगितलं, की शुक्रवारी दिल्लीतील झज्जर, गुरुग्राम, बागपत, गाझियाबाद आणि सोनीपत या शहरांमध्ये सर्वाधिक प्रदूषण पहायला मिळाले. प्रदूषणाच्या बाबतीत शून्य ते 50 मधील AQI चांगला, 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम, 201 ते 300 खराब, 301 ते 400 अत्यंत खराब आणि 401 ते 500 दरम्यान गंभीर श्रेणीत समावेश होतो. राजधानीतील वाढत्या प्रदूषणापासून दिलासा देण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) च्या आपत्कालीन स्तरावरील चरणांच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झालीय.

loading image
go to top