लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊनची घोषणा झाली अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 14 April 2020

लग्नाच्या दुसऱया दिवशी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि वऱहाडींना नवरीच्याच गावात राहावे लागले. 21 दिवसानंतर आपल्या गावाला जायला मिळेल असे वाटत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची मुदत वाढवली. यामुळे वऱहाडींना 3 मे पर्यंत गावात राहावे लागणार आहे.

छपरा (बिहार) : लग्नाच्या दुसऱया दिवशी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि वऱहाडींना नवरीच्याच गावात राहावे लागले. 21 दिवसानंतर आपल्या गावाला जायला मिळेल असे वाटत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची मुदत वाढवली. यामुळे वऱहाडींना 3 मे पर्यंत गावात राहावे लागणार आहे.

दानशूर भिकाऱयांनी केली देशासाठी 'एवढी' मदत...

देशभरात लॉकडाऊननंतर अनेकजण विविध भागांमध्ये अडकले आहेत. पण, छपरा गावामध्ये वऱहाडीच अडकले आहेत. नवरी छपरा येथील तर नवरदेव झारखंडमधील. विवाहासाठी वऱहाडी रेल्वेने छपरा गावात आले होते. विवाहाच्या दुसऱया दिवशी ते रेल्वेने माघारी जाणार होते. पण, लॉकडाऊनची घोषणा झाली आणि ते गावामध्ये अडकले. यामुळे रेल्वेसह सर्व वाहतूक बंद झाली. यानंतर नवरीमुलीच्या कुटुंबीयांनी नवरा-नवरी आणि वऱ्हाडींना गावाबाहेर एक शाळेत राहण्याची जागा करुन दिली आहे. नवरी पण माहेरी न राहता वऱ्हाडींसोबत शाळेत राहात आहे.

Video: रवींद्र जडेजाने हातात घेतली तलवार आणि...

गेल्या 22 दिवसांपासून 36 वऱ्हाडी शाळेत राहत आहेत. दरम्यानच्या काळात वऱ्हाडींकडील सर्व पैसे संपले आहेत. ग्रामस्थ त्यांना जेवण पुरवत आहे. आज लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्याला गावाला जायला मिळेल या आशेत वङाडी होते. सर्वजण टीव्हीसमोर डोळे लावून बसले होते. मात्र, पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली. जवळील सर्व पैसे संपले पुढील 21 दिवस कसे काढायचे या विचाराने ते त्रस्त झाले आहे. घरी जाण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे मदतीचे आवाहन केले आहे. मात्र, झारखंड प्रशासनाने त्यांची विनंती फेटाळली आहे.

लॉकडाऊनच्या काळात 'गुगल पे'ची खास सेवा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thirty six wedding congregations in bridges village from twenty two days