संघर्षाचा धोका कायम ; एम. एम. नरवणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukund Naravane
संघर्षाचा धोका कायम ; एम. एम. नरवणे

संघर्षाचा धोका कायम ; एम. एम. नरवणे

नवी दिल्ली : सीमावादावरून चीनशी (China)असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सहमतीने लष्कर माघारीवर उभय देश काम करत असून त्यादिशेने काही सकारात्मक घडामोडी घडल्या आहेत. परंतु, अजूनही संघर्षाचा धोका कायम आहे,(threat of conflict persists) अशी स्पष्टोक्ती लष्करप्रमुख एम. एम. नरवणे (M. M. Narvane)यांनी आज केली.

हेही वाचा: कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

लष्कर दिनाच्या सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना लष्कर प्रमुख नरवणे यांनी सीमावादावर संघर्ष हा अंतिम मार्ग असल्याची टिप्पणी केली. मात्र, संघर्ष झाला तर भारतच विजयी होईल असा सूचक इशारा दिला असून अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, असेही ठणकावले. भारत आणि चीन दरम्यान लष्करी पातळीवरील वाटाघाटींच्या १४ व्या फेरीबद्दलही लष्करप्रमुखांनी आशावादी भाष्य केले. ते म्हणाले, की कोअर कमांडर पातळीवरील वाटाघाटी सुरू आहेत. येत्या काही दिवसात सकारात्मक घडामोडी अपेक्षित आहेत. परंतु, मर्यादित स्वरूपाचीच सैन्य माघार झाली असल्याने संघर्षाचा धोका कायम आहे. ताबारेषेमध्ये एकतर्फी बदल करण्याचा चीनचा प्रयत्न भारताने उधळून लावला. चीनशी वाटाघाटी करण्याबरोबरच भारताने सैन्य क्षमता आणि सीमाभागात पायाभूत सुविधा वाढविण्यावर लक्ष दिले आहे. पॅंगॉंग त्सो सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण टोकाला जोडणारा पूल चीन उभारत असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लष्करप्रमुख नरवणे यांनी, या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की असे प्रकार घडण्याचे कारण म्हणजे ताबा रेषेबाबत एकमत नसून दोन्ही देशांचे वेगवेगळे आकलन आहे.

हेही वाचा: रोजगार एवढा देऊ की कॅनडाहून शीख परततील: केजरीवाल

नागालँडच्या गोळीबाराची चौकशी सुरू

पूर्व आणि पश्चिम म्हणजेच चीन आणि पाकिस्तान सीमेवर असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सैन्यदलांची योग्यपद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. नागालँडमध्ये दहशतवाद्यांवरील कारवाई मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी गैरसमजातून केलेल्या गोळीबारात १४ स्थानिक लोकांना प्राण गमवावे लागले होते. लष्करप्रमुखांनी ही घटना वेदनादायी आणि दुर्दैवी असल्याचे सांगितले. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top