Jammu Kashmir: तीन दिवसांपासून बेपत्ता जवानाचा संशयास्पद मृतदेह हाती

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भारतीय जवानाचा मृतदेह अखेर काश्मीर पोलीसांच्या हाती लागला आहे.
kashmir police
kashmir policesakal

जम्मू काश्मीर : तीन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या भारतीय सुरक्षा दलातील एका जवानाचा मृतदेह आज सापडल्याची माहीती मिळाली आहे. तसेच हा मृतदेह संशयास्पद अवस्थेत मिळाला असून या शरीरावर कुठलीही जखम आढळून आलेली नाही. "बेपत्ता झाल्यापासून तीन दिवसानंतर समीर अहमद मल्ला या जवानाचा मृतदेह काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सापडला आहे." असं जम्मू काश्मीर पोलीसांनी माहीती देताना सांगितलं.

जम्मू काश्मीरमधील बडगाम आणि बारामुल्ला या दोन जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. तसेच याअगोदरही तिथे अनेक वेळा दहशदवादी हल्ले झाले आहेत. एका आठवड्यापूर्वी बारामुल्ला आणि बडगाम येथून सुरक्षा दल आणि काश्मीर पोलीसांनी ळष्कर-ए-तोय्यबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. तसेच चार आठवड्यापूर्वी ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवादी संघटना अल-कायदाच्या तव्हीद अहमद याला बडगाम जिल्ह्यातून अटक केली होती.

kashmir police
आमच्या अंतर्गत मुद्यांमध्ये ढवळाढवळ करु नका; कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने सुनावलं

या घटनेवरुन या दोन जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्याचं आपल्याला दिसत आहेत. त्या कारवायांना चोख प्रत्युत्तर सुरक्षा दल आणि काश्मीर पोलीसांकडून दिलं जात आहे.

दरम्यान या घटनेची माहीती देताना पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी सांगितलं की, समीर अहमद मल्ला यांच्या मृतदेहावर कुठल्याही प्रकारची जखम नसून व्रणदेखील आढळले नाहीत. त्याचबरोबर आम्ही या संशयास्पद घटनेकडे दहशतवादी हल्ला आणि खून अशा दोन्ही दृष्टीकोनातून पाहत आहोत. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास पोलीसांकडून चालू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com