Odisha Three Football Centres : भारतीय फुटबॉललाही ओडिशा राज्याचा आधार

साधन-सुविधांची निर्मिती; भुवनेश्वर येथे तीन फुटबॉल प्रशिक्षण केंद्रांचे उद्‍घाटन
three football centres bhubaneswar odisha naveen patnaik intercontinental cup 2023
three football centres bhubaneswar odisha naveen patnaik intercontinental cup 2023sakal

भुवनेश्वर : भारतीय हॉकीचे माहेरघर बनत असलेल्या ओडिशा राज्याने भारतीय फुटबॉलमध्येही भरीव योगदान देण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भुवनेश्वर येथे तीन फुटबॉल प्रशिक्षण केंद्रांचे उद्‍घाटन केले. त्यामुळे अद्ययावत साधनसुविधा निर्मितीस हातभार लागेल.

भुवनेश्वर येथे ९ जूनपासून चार देशांची इंटरकाँटिनेंटल फुटबॉल स्पर्धा खेळली जाईल. स्पर्धेत यजमान भारतासह लेबनॉन, मंगोलिया व व्हानुआतू या देशांचे संघ खेळतील. त्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तीन फुटबॉल प्रशिक्षण केंद्रे भुवनेश्वर येथे कार्यान्वित झाली. मुख्यमंत्री पटनाईक यांच्या हस्ते ओडिशा फुटबॉल अकादमी, भुवनेश्वर फुटबॉल अकादमी आणि कॅपिटल अरेना फुटबॉल केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीही उपस्थित होता.

three football centres bhubaneswar odisha naveen patnaik intercontinental cup 2023
Mumbai : पश्चिम रेल्वेचे ऑपरेशन अमानत सुसाट! अवघ्या महिन्याभरात ३.१६ कोटींच्या वस्तू केल्या परत

तिन्ही फुटबॉल प्रशिक्षण केंद्रांचे उद्‍घाटन करताना खूप आनंद होत असून ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री पटनाईक यांनी सांगितले. ओडिशातील फुटबॉल विकासात या क्रीडा साधनसुविधा मैलाचा दगड ठरतील. खेळाडूंना या ठिकाणी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय संघालाही फायदा

भुवनेश्वर येथील तिन्ही फुटबॉल प्रशिक्षण केंद्रांत भारताच्या १६ आणि १९ वर्षांखालील वयोगटातील फुटबॉल संघासाठी सराव शिबिराची सोय असेल.

three football centres bhubaneswar odisha naveen patnaik intercontinental cup 2023
Mumbai News : गोरेगावमधील फाळके चित्रनगरीतील विकासकामांसाठी १०० कोटींचा निधी

एकूण ९० कोटी रुपये खर्च

भुवनेश्वरस्थित तिन्ही फुटबॉल प्रशिक्षण केंद्रे विकसित करण्यासाठी ९० कोटी रुपये खर्च आला आहे. या ठिकाणी फिफाचे प्रमाणपत्र असलेले एकूण सहा मैदाने आहेत. त्यापैकी पाच नैसर्गिक गवत असलेली, तर एक सिंथेटिक टर्फ मैदान आहे. एलईडी प्रकाशझोत व्यवस्था, खेळाडूंसाठी प्रसाधनगृह, गॅलरी, व्यायामशाळा, प्रशिक्षकांसाठी खोली व इतर सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत. तिन्ही केंद्रे भुवनेश्वर शहराच्या मध्यभागी आहेत.

three football centres bhubaneswar odisha naveen patnaik intercontinental cup 2023
Mumbai : मुंबईतील १५ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर; भाडेकरू, रहिवाशांना नोटिसा

मुलींसाठीही अकादमीचे नियोजन

केंद्रपारा जिल्ह्यातील अऊल येथे मुलींसाठी कृत्रिम टर्फची व्यवस्था असलेल्या फुटबॉल अकादमीची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री पटनाईक यांनी यावेळी केली. ओडिशात फुटबॉलप्रती मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय. राज्यातील मुलांना फुटबॉलची गोडी लागावी, या उद्देशाने भुवनेश्वर येथील तिन्ही फुटबॉल प्रशिक्षण केंद्रांत ६ ते १२ वर्षे वयोगटातील खेळाडूंसाठी पायाभूत पातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com